दिनांक १८ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती २०१२ पासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. यंदा समितीने २ दिवसीय भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन केले असून, तालुक्यात प्रथमच ११ फूट उंचीच्या शिवप्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या शिवजयंतीत बाल कलाकार आणि मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणार असून विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

या निमित्ताने ह.भ.प. प्रदीप महाराज सोळुंखे यांचे शिवकिर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच, श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, चेअरमन तसेच तमाम शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बालु मखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोन दिवसीय शिवजयंती महोत्सवाचे कार्यक्रम
शिवजयंतीनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी खालील कार्यक्रम होणार आहेत:
- सकाळी १० ते दुपारी २: रांगोळी स्पर्धा (ठिकाण: श्रीगोंदा नगरपरिषदेचे सांस्कृतिक भवन, पंतनगर)
- दुपारी २ ते सायं. ६: छत्रपती बाईक रॅली आणि रथ यात्रा श्रीगोंदा शहरातून मार्गस्थ
- सायं. ६:३० ते ७: राष्ट्रपुरुष दीप प्रज्वलन व दीपोत्सव (फुले सर्कल)
- प्रमुख पाहुणे: सावित्रीबाई फुले यांच्या वंशज डॉ. नूतन लोणकर-नेवसे
१९ फेब्रुवारी – शिवजयंती महोत्सव
- सकाळी ६:०० ते ७:३०: छत्रपती मॅरेथॉन स्पर्धा (ठिकाण: जोधपूर मारुती चौक)
- सकाळी ९:००:११ फूट उंच शिवप्रतिमेचे पूजन
- प्रमुख मान्यवर: माजी मंत्री बबनराव पाचपुते, खा. निलेश लंके, आमदार विक्रम पाचपुते, शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे, पोलिस निरीक्षक किरण शिंदे
- सकाळी १० ते ११: पालखी मिरवणूक श्रीगोंदा शहरातून मार्गस्थ
- सायं. ५: लहान मुलांची भाषणे व बाल सांस्कृतिक कार्यक्रम
- सायं. ८: ह.भ.प. प्रदीप महाराज सोळुंखे यांचे शिवकिर्तन
- त्यानंतर स्नेहभोजन

स्पर्धा व पारितोषिक वितरण
सर्व स्पर्धांसाठी इच्छुकांनी नावनोंदणी करावी.
- स्पर्धांचा निकाल २३ फेब्रुवारी रोजी संत शेख महंमद महाराज मंदिर येथे जाहीर करण्यात येईल.
- विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान केली जातील.
शिवजयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीगोंदा शहर व तालुक्यातील नागरिकांनी, राजकीय व सामाजिक संघटनांनी, तरुण मंडळांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
शिवजयंतीसह सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अध्यक्ष बालू मखरे, उपाध्यक्ष चांदणी खेतमाळीस, कार्याध्यक्ष मीरा शिंदे, खजिनदार राजश्री शिंदे, सचिव मीरा खेंडके, ज्योती खेडकर तसेच मार्गदर्शक अरविंद कापसे, राजेंद्र राऊत, शाम जरे, अजिजभाई शेख, गोरख घोडके, परिश जाधव आणि दिपक मखरे यांनी नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

पत्रकार परिषद…

श्रीगोंदा: शिवजयंती २०२५ सार्वत्रिक उत्सव म्हणून साजरी होणार..
श्रीगोंदा शहरात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अरविंद कापसे यांनी शिवजयंती २०२५ बाबत माहिती दिली. मागील १३ वर्षांपासून शासकीय तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जात असून, हा उत्सव कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा समुदायाचा नसून सार्वत्रिक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक एकोपा राखण्यासाठी यावर्षी भगवा, पिवळा, निळा आणि हिरवा असे सर्व झेंडे प्रतीक म्हणून वापरण्यात येणार आहेत. शिवप्रेमींमध्ये सामाजिक भान जागृत व्हावे आणि महापुरुषांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेला मीराताई शिंदे, चांदणी खेतमाळीस, दीपक मखरे यांच्यासह पदाधिकारी व जयंती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(पत्रकार परिषद)

Advertise..
