महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.. विद्यार्थ्यांचा गौरव; प्रेरणादायी विचारांची बरसात..

दिनांक ११ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:-

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापक तसेच क्रीडापटूंना सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव प्राचार्य बंडू पवार उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाच्या महत्त्वावर भर देत, अभ्यासातून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचे आवाहन केले.

या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध रानकवी तुकाराम धांडे यांच्या स्फूर्तिदायी कवितांचे सादरीकरण. त्यांनी विद्यार्थ्यांना मायमातीशी नाळ जोडण्याचा तसेच निसर्ग व शेतीवर प्रेम करण्याचा संदेश दिला.

समारंभाचे प्रमुख वक्ते डॉ. अरुण शिंदे म्हणाले की, “सुंदर व आनंददायी आयुष्य जगण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.” परिक्रमा संकुलाच्या प्रमुख डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांनी युवकांना मेहनतीचे महत्त्व सांगितले. माजी आमदार राहुल जगताप यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना अभ्यासातून व्यक्तिमत्त्व प्रकट करण्याचा संदेश दिला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस होते. ते म्हणाले, “महाविद्यालयाने प्रतिकूल परिस्थितीत उभे राहत उल्लेखनीय प्रगती केली आहे. युवकांनी मेहनत करून समाजात मोठी उंची गाठावी.” उपविभागीय अधिकारी नवनाथ बोडके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडाशिक्षणाचे महत्त्व विशद केले.

समारंभाच्या प्रारंभी प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन डॉ. बापू देवकर, प्रा. कल्पना बागुल व प्रा. संजय डफळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शहाजी मखरे व डॉ. राम ढगे यांनी केले.

यावेळी महावीर पटवा, कुंडलिकराव दरेकर, उपनगराध्यक्ष ज्योतीताई खेडकर, राजू गोरे, सतीश मखरे, पिटर रणसिंग, रवीशेठ दंडनायक, प्राचार्य दिलीप भुजबळ, मुख्याध्यापिका गीता चौधरी, प्रा. सुनीता सोनावळे, डॉ. प्रकाश साळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समारंभाच्या निमित्ताने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशाचा गौरव करण्यात आलेला हा समारंभ प्रेरणादायी ठरला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading