दिनांक ११ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील काही नामांकित खासगी हॉस्पिटल्स आणि त्यांच्या एजंट्सनी हेल्थ इन्शुरन्स योजनांचा गैरफायदा घेतल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. यामध्ये खोट्या उपचारांची नोंद करून बनावट पद्धतीने इन्शुरन्स क्लेम करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

हेल्थ इन्शुरन्स योजना ही सामान्य लोकांसाठी आरोग्य सुरक्षेची महत्त्वाची हमी आहे. लोक वार्षिक १० ते २० हजार रुपये प्रीमियम भरून ५ ते २० लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चाचा लाभ मिळवू शकतात. मात्र, काही हॉस्पिटल्सनी या योजनेचा अपहार करत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या रकमेत ५०% ते ६०% कट केला असून उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या गैरव्यवहारात काही एजंट्सची देखील सहभागिता असल्याचे निष्पन्न होणार आहे. कायदेशीर मार्गाने या प्रकरणाचे पुरावे गोळा करण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी काही सामाजिक संघटना पुढाकार घेत आहेत.

अशा विविध प्रकरणात न्याय मिळवून कायदा सर्वांसाठी समान असल्याचे दाखवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

काही प्रकारांच्या उघडकीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाकडून देखील योग्य तपासणीची मागणी होत आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
