अनुराधाताई नागवडे यांनी तालुक्याचे नेतृत्व करावे:राजू गोरे..

दिनांक २० ऑक्टोबर,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसची तालुका आढावा बैठक, काल दिनांक १९ ऑक्टोबर रोजी नक्षत्र मंगल कार्यालयामध्ये नगरपरिषदचे (माजी उपनगराध्यक्ष) राजीव गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व (जिल्हा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष) किरणजी काळे, (महिला बालकल्याणच्या माजी सभापती) व (जिल्हा परिषद सदस्य) अनुराधाताई नागवडे, (जिल्हा कार्याध्यक्ष) सोमेश्वर दिवटे, निखीलजी पापडेजा, (प्रदेशचे युवक सरचिटणीस) प्रशांत भैय्या ओगले, (तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष) दीपक पाटील भोसले, (माजी नगराध्यक्ष व गटनेते) मनोहर दादा पोटे, (युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष) गोरख बायकर, (शहराध्यक्ष) योगेश मेहेत्रे, (नगरसेवक) प्रशांत गोरे, (नगरसेवक) s.p. कोथिंबीर, (नगरसेवक) राजाभाऊ लोखंडे, (नगरसेवक) समीर बोरा, (नागवडे कारखान्याचे संचालक) योगेश भोईटे, सुरेखाताई लकडे, संजय मांडोळे, संजय महांडुळे, (श्रीगोंदा समन्वयक) राहुल उगले सह वरील सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.

यावेळी किरण काळे युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, तालुका युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशने दिलेले सर्व कार्य अतिशय चांगल्या मार्गाने आजपर्यंत केलेली आहेत. याच्यापुढे ही असेच काम श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसचे कार्यकर्ते करतील याचा मला विश्वास आहे. असे ते म्हणाले, त्याचबरोबर नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र किरण काळे व अनुराधाताई नागवडे यांच्या हस्ते देण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूदादा गोरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेसचे नेतृत्व यापुढे अनुराधाताई नागवडे यांनी करावे, जेणेकरून काँग्रेसला तालुक्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल असे म्हणाले.

अनुराधाताई नागवडे यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलत असतांना, यापुढे तालुक्यामध्ये एकत्रित राहून, काँग्रेस पक्षाचे काम चांगल्या प्रकारे करू, असा आलेल्या पाहुण्यांना विश्वास दिला आणि सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रशांत ओगले यांनी त्यांच्या भाषणात बोलत असतांना, आज सर्वजण एका विचारपीठावर पाहून आनंद होतोय. यापुढे श्रीगोंदा तालुक्याचे नेतृत्व अनुराधाताई नागवडेंनी करावं, आम्ही सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास तयार आहोत. अशी ग्वाही ओगलेंनी त्यांच्या भाषणात दिली. तसेच, सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला भाऊ डांगे, सचिन गायकवाड, प्रवीण ढगे, संदीप वागस्कर, निलेश उबाळे, लाला बारगुजे, विजय बारगुजे, पवन मोहिते, अनिल कणसे, अमोल भोसले, नितीन खेडकर, सनी चव्हाण, महेश दरेकर, मुनीर सय्यद, प्रशांत सीदनकर, अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(राजू गोरे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading