बाजार समिती सदस्यपद रद्द प्रकरणी अपील; १६ जून रोजी सुनावणी.

दिनांक १० जून २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सदस्यपद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपीलावर येत्या १६ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे. अर्जदारांनी महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम ५२ बी अंतर्गत सदर अपील दाखल केले आहे.

प्रतिवादी साजन सदाशिव पाचपूते यांच्याविरोधात केलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे की, अर्जदार बाजार समितीच्या दि. २८ ऑक्टोबर २०२४, २७ डिसेंबर २०२४ व २५ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या तीन लागोपाठच्या मासिक सभा परवानगीशिवाय अनुपस्थित राहिल्यामुळे कलम २४ नुसार त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय दि. २४ मार्च २०२५ रोजीच्या समितीच्या ठरावानुसार घेण्यात आला होता आणि दि. १६ एप्रिल २०२५ रोजी त्यांना लेखी स्वरूपात कळवण्यात आले होते.

या निर्णयाविरोधात अर्जदारांनी अपील दाखल केल्याने आता या प्रकरणाची सुनावणी येत्या १६ जूनला होणार असून, दोन्ही पक्षकार किंवा त्यांच्या वकीलांनी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांनी अपीलसंबंधित सर्व कागदपत्रांच्या प्रती प्रतिवादीला देऊन त्याची पोहोच सुनावणीवेळी सादर करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise….

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading