गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल.. श्रीगोंदा पोलिसांची कारवाई, २२ हजार रुपये किमतीच्या दोन जनावरांची सुटका..

दिनांक ९ जुन २०२५,श्रीगोंदा:

गोवंश हत्या बंदी असतानाही गीर व खिलार जातीच्या गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करत असलेल्या एका इसमावर श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दिनांक ७ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास काष्टी (ता. श्रीगोंदा) गावच्या हद्दीत घडली.

याप्रकरणी कालीदास मोहन कोथिबिरे (वय ३२, व्यवसाय – शेती, रा. कोथिबिरे मळा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी राजू मच्छिंद्र साळवे (वय ४५, रा. पोंदवडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याने महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारणा २०१५) मधील कलम ५, ५(अ), ५(ब), ९चे उल्लंघन करत गीर व खिलार जातीची दोन जनावरे कत्तलीसाठी नेल्याचे उघडकीस आले.

सदर जनावरे पुढीलप्रमाणे आहेत –

  1. तांबट रंगाची, ४ वर्षे वयाची गीर जातीची क्रॉस गाय – अंदाजे किंमत ₹१४०००/-
  2. पांढऱ्या रंगाची, ३ वर्षे वयाची खिलार जातीची क्रॉस गाय – अंदाजे किंमत ₹८०००/-

एकूण मालमत्ता अंदाजे ₹२२०००/- च्या जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे.

ही कारवाई पोलीस हवालदार अभय काळे (पो.हे.कॉ./५५४) यांच्या नोंदीवरून करण्यात आली असून तपास पोलीस हवालदार गुलाब मोरे (पो.हे.कॉ./१६४५) करत आहेत. या प्रकरणाच्या देखरेखीखाली प्रभारी अधिकारी पो.नि. किरण शिंदे कार्यरत आहेत.

स्त्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading