अनिल भारती यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती..

दिनांक २७ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असणारे, अनिल भारती यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अनिल भारती यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. सामान्य माणसाचे प्राधान्याने काम मार्गी लावण्यासाठी भारती सक्रिय असतात. यामुळे वंचित समाजाचे ते आदर्श ठरेल आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

सविस्तर असे की, मुंगुसवाडे (ता.पाथर्डी) येथील रहिवासी व श्रीगोंदे पोलिस स्टेशनला नेमणुकीस असलेले सहाय्यक फौजदार अनिल शंकरराव भारती यांना पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. भारती हे १५ मार्च १९८८ ला अहमदनगर जिल्हा पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. भिंगार कॅम्प, अकोले, संगमनेर तालुका, घारगाव व कोतवाली पोलिस स्टेशन, नगर शहर येथे त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे .

विभागीय अहर्ता परीक्षा सन २०१३ मधील अंमलदारांपैकी निवड सूची २०१९ – २०२० मधील सेवा ज्येष्ठतेनुसार भारती यांना पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली असल्याचे समजते आहे.

या निवडीबद्दल त्यांचे सहकारी, मित्र, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सानप, गावित, पाटील, अमोल आजबे, बोंद्रे नाना, प्रकाश धंदाडे, साठे, अमोल कोतकर, संतोष कोपनर सह पोलीस कर्मचारी व कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading