शिवसेना श्रीगोंदा तालुका प्रमुख पदी बाळासाहेब दुतारे यांची नियुक्ती..

दिनांक २५ डिसेंबर, श्रीगोंदा:

शिवसेना अ.नगर संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांतजी गाडे (सर) यांनी शिवसेना श्रीगोंदा तालुका प्रमुख पदी बाळासाहेब दुतारे यांची नियुक्ती केली आहे. यावेळी (नगरसेवक) योगीराज गाडे, (शिवसेना नगर तालुका प्रमुख) राजेद्र भगत, (युवासेना जिल्हाप्रमुख) रविभाऊ वाकळे उपस्थित होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

(जेष्ठनेते) भाऊसाहेब गोरे, (शहर प्रमुख) संतोष खेतमाळीस, (तालुका संघटक) नंदकुमार ताडे, (युवासेना तालुका प्रमुख) हरीभाऊ काळे, (उप तालुका प्रमुख) संतोष शिंदे, (जेष्ठनेते) प्रमोद पावसे, (युवासेना तालुका संघटक) नाथाभाऊ पवार, (युवासेना शहर प्रमुख) ओंकार शिदे, राहुल भालेकर, दादासाहेब ढगे, योगेश भुतकर, मयुर गोरे यांनी अभिनंदन केले आहे.

जुने शिवसैनिक नानासाहेब दुतारे हे इंदिरानगर या भागातील १९९०-९१ साली शाखाप्रमुख होते. जन्मजात शिवसेनेशी नात असणारे बाळासाहेब दुतारे हे २०१२ साली छञपती शिवाजी चौकातील शिवसेना शाखेच्या युवासेनेचे शाखाप्रमुख झाले. त्या शाखेत हरीभाऊ काळे हे शिवसेना शाखाप्रमुख होते. त्यानंतर कट्टर शिवसैनिकांची फळी तयार करुन, संघटनेचे काम करत पक्ष कार्य केले.

त्यानंतर २०१६ साली युवासेना उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. पक्षाचे सर्व आदेश मानुन काम करताना अनेक तरूण पक्षाशी जोडण्याचे व टिकवण्याचे काम त्यांनी केले. यासाठी पक्ष नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अनेक सहकाऱ्यांशी संवाद साधत संपर्क वाढवला. यांची पक्षनेत्यांनी दखल घेऊन दिनांक २४ डिसेंबर २० रोजी एका बहुजन समाजातील ३० वर्षाच्या तरूणाला तालुकाप्रमुख पदी विराजमान होऊन शिवसेनेची सेवा करण्याची संधी भाऊ व सरांनी दिली शिवसेनेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच महिला आघाडीने त्याचे याबद्दल अभिंनदन केले आहे.

स्रोत:(हरिभाऊ काळे यांचे प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading