प्रजापिता सम्राट अशोक (भाग ७).

राजकुमारांची परीक्षा

एकदा महाराजांच्या सांगण्यावरून सर्व राजकुमारांची परीक्षा घेण्याचे ठरले. आतापर्यंत राजकुमार कोणकोणत्या गोष्टीत प्रवीण झाले आहेत ते पाहायचे होते. सर्व राजकुमारांना बागेत येण्यास सांगितले. सर्व राजकुमार आपापल्या सजवलेल्या रथातून त्या ठिकाणी हजर झाले होते. रथावर अनेक रंगाचे ध्वज फडकत होते.

फुलांच्या माळांनी आणि आरशांनी रथ नटवलेले होते. सुसीमच्या ध्वजावर फुललेल्या पिसा – याचा मोर दिसत होता. मौर्यकुलाचे ते भूषण होते. प्रथम अशोक येथे अनेक वेळा झालेल्या अपमानामुळे जाण्यास तयार नव्हता. परंतु मातोश्री सुभद्रांगीने त्याची समजूत काढली . राधागुप्त म्हणाले, “कुमार, ही परीक्षा महत्त्वाची आहे, कारण या परीक्षेत सर्वप्रथम व सर्वश्रेष्ठ जो कोणी ठरेल त्यालाच या मगधचा सम्राट निवडण्याचा महाराजांच्या मनात विचार आहे. ” या नंतर अशोक तयार झाला. अशोक परीक्षास्थळी जाण्यासाठी निघाला. तो आपल्या रथ शाळेजवळ आला. रथसारथी अशोकाचा लहानपणापासूनचा मित्र सुरथ हा तेथे अगदी घाबरलेल्या अवस्थेत होता. अशोक म्हणाला, “ सुरथ , रथ घेऊन ये . ” ” रथ नाही . ” ” नाही म्हणजे ? ” ” रथाची दोन्ही चाके मोडली आहेत .

https://bit.ly/bspmycityshrigonda

“अशोकाचा राग अनावर झाला आणि अशोक जवळ जवळ त्याच्या अंगावर धावला. सुरथ थरतर कापत होता. त्याने जवळच पडलेली कुऱ्हाड दाखविली. तिला चाकाचा रंग लागला होता. अशोकाच्या पुढे प्रश्न पडला आता काय ? आपण वेळेत कसे पोहोचणार ? मती गुंग होणयाची वेळ आली होती . परंतु सुदैवाने गजशाळेजवळ एक हत्ती दिसला . माहूत नाही, अंबारी नाही. भाल्याच्या साहाय्याने अशोकने उडी घेतली आणि हत्तीवर बसून त्या सजविलेल्या मंडपात हजर झाला. तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या.

अशोकाने आपली नजर चौफेर फिरविली. तेव्हा सुसीम कुचेष्टा करीत हसत होता. अशोक या ठिकाणी उशीरा आला, वेळेच्या बाबतीत मागे पडला असे महाराज म्हणाले. तेव्हा अशोकाने सांगितले , ” पिताश्री, माझ्या रथाची चाकं कोणीतरी दुष्टांनी मोडली. घोड्याच्या पायांना जखमा केल्या म्हणून मला हत्तीवरून यावे लागले . ” नंतर सर्व राजकुमारांना भोजनासाठी बसण्यास सांगण्यात आले. सर्व राजकुमार सोन्या – चांदीने मढविलेल्या आसनावर भोजनासाठी बसलेले होते .

अशोकाला बसायला जागा नव्हती. त्याने मनात म्हटले – आसनं सोडून बाकी सर्वश्रेष्ठ तर ही धरती. त्याने आपला दुपट्टा जमिनीवर अंथरला आणि त्यावर मांडी घालून बसला. त्यानंतर सोन्या – चांदीच्या ताटातून जेवण वाढणयात आले. अशोकाच्या मातोश्रीने त्याच्याकरिता मातीच्या भांड्यात दही, भात आणि पाणी पिण्यासाठी मातीचं मडकंच पाठविले होते. निरनिराळ्या परीक्षा जरी घेण्यात येत असल्या तरी, अशोकच सर्वश्रेष्ठ ठरत होता. भावी सम्राट अशोकच होईल असे प्रत्येकाला वाटत होते. परंतु बिंदूसाराला आपला सर्वात मोठा कुमार सुसीम हाच विजयी ठरावा अशी मनीषा होती. कारण सुसीम हा सर्वात मोठा मुलगा होता.

मोठ्या मुलाचा तो मान असतो. तरीही पिंगल वत्सजीव यांना महाराजांनी विचारले, ” आचार्य सर्वात योग्य कोण ? ”पिंगल परिव्रजक यांनी अगदी प्रामाणिकपणे अशोक हा सर्वश्रेष्ठ आणि योग्य आहे हे जाणले होते. परंतु न्याय देणे अवघड होऊन बसले होते. बिंदूसार महाराजांच्या मते सर्वात मोठा मुलगा हा राज्याचा भावी सम्राट असावा असे वाटत होते. तेव्हा सरळ न्याय देण्यापेक्षा ते म्हणाले, ” महाराज ज्याची सवारी (वाहन) सगळ्यात चांगली आहे तो सर्वात योग्य.” अशोकाशिवाय बाकी राजकुमारांना वाटले की , आपले रथ हे वाहन चांगले आहे , कारण ते सोन्या – चांदीचे आहेत . परंतु अशोकाने मनोमन जाणले की, वीराला आणि राज्याला शोभणारी सर्वात चांगली सवारी म्हणजे हत्ती .

ही सर्वात चांगली सवारी आहे. महाराजांनी आणखी परीक्षा घेण्यास सांगितले. परिव्रजक पुढे म्हणाले, ” ज्याचे आसन सर्वात चांगले तोच योग्य. ” राजकुमार खुष होते. त्याची आसनं सोन्या – चांदीची होती. अशोकाने ओळखले की सर्वात चांगले आणि श्रेष्ठ आसन ही धरतीमाताच आहे. जो या धरतीवर, येथील मातीवर प्रेम करतो तोच या मातीवर उभा असतो. तोच विजयी होतो. मातीचं नातं हे सर्वश्रेष्ठ नातं आहे. तिसरी परीक्षा ज्याची भोजनाची भांडी चांगली तो योग्य. अशोकाशिवाय बाकी राजकुमार सोन्या – चांदीच्या भांड्यांतून ( ताटातून ) सुग्रास भोजन घेत होते. परंतु, अशोकाची स्वच्छ आणि साधी मातीची भांडी होती. त्याच्या भोजनात दही – भात आणि पिण्यासाठी मातीच्या भांड्यातील स्वच्छ गार पाणी. यामुळे अशोकच या ठिकाणीही योग्य होता. बाकी राजकुमार मात्र भ्रमात होते की , आपणच सर्वात योग्य ठरू .

अशोकाच्या या परीक्षेतील कामगिरीवर दरबारातील अनेक अधिकारी खूष होते. राधागुप्त यांनी तर अशोकासाठी खूप प्रयत्न केले. अशोकाच्या चातुर्याने ते खूपच प्रभावित झाले होते. सर्व दरवाराला वाटत होते की, अशोक हाच योग्य व श्रेष्ठ आहे. याशिवाय मुष्टीयुद्ध , द्वंद्वयुद्ध , भालाफेक अशा अनेक गोष्टींत तो श्रेष्ठ ठरला. परंतु या परीक्षेत महाराजांनी अशोकाचे कौतुक तर केलं नाहीच उलट त्यांच्या कपाळावर आठ्या चढल्या. तेव्हा अशोकाच्या मनात अंगार फुलले. संतापाने अंग थरथरू लागले. तेव्हा राधागुप्ताचे डोळे पाणावले व ते म्हणाले, “कुमार, एवढा राग वरा नाही. राग आणि अग्नी हे सारखेच असतात. ते अवेळी पेटले की त्यांचा भडका उडतो आणि ….. “काशीचे भास्कराचार्य पट्टमहिषीच्या लेखनिकाचे काम करत होते.

तेव्हा त्यांची भेट घेऊन पट्टमहिषी यांनी सुसीमच्या निवडीचा डाव साधला होता. सुसीमची निवड झाली. तो विजयी हास्य करत आपल्या रथात बसून अशोकाकडे पाहून तुच्छतेने हसला. तेव्हा विद्याधर गुरूजी म्हणाले , ” केवढा हा पक्षपात ! ” हा डाव कोणी कसा साधला हे कळायला वेळ लागला नाही. हा उघड उघड अशोकावर अन्याय होता. अशोकाला विद्याधर गुरूजी म्हणाले, ” माझ्या रथातून चल घरी. ” अशोक गुरूजींना वंदन करीत म्हणाला , “ या अपयशी विद्यार्थ्याला रथ कशाला ? ” ” कुमार, मनाला लावून घेऊ नकोस.

निर्णय चुकीचा होता. तो तसा होणार होता याची कल्पना आम्हाला आली होती. ” अशोक मातृसदनाजवळ आला. तेव्हा पिंगल वत्सजीव म्हणाले होते, “ सुभे, तुझ्या या बालसूर्याचं नीट जतन कर आणि त्याचे भविष्य नीट ध्यानी ठेव. आता जे घडायचे ते घडले. ” पण या तेजस्वी सूर्याला अंधराचं भय कधीच वाटत नाही..

क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading