एसबीआय ATM मध्ये इसमाची फसवणूक करीत, १ लाख २० हजाराला गंडा..

दिनांक २६ डिसेंबर, श्रीगोंदा:

२५ डिसेंबर रोजी श्रीगोंदा एसटी स्टँड शेजारील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये एका अज्ञात तरुणाने ३८ वर्षीय इसमाला १ लाख २० हजार रुपयांना गंडा घातला आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

एटीएम चे मिनी स्टेटमेंट काढून देतो म्हणून, तुळशीराम लोंढे राहणार चांडगाव श्रीगोंदा या इसमाकडून त्या अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्ड घेऊन, विश्वासाने पिन नंबर घेतला व एटीएमचे स्टेटमेंट काढून दिले. मात्र, एटीएम परत करताना दुसरे एटीएम देऊन, नमूद एटीएम मधून एक लाख वीस हजार रुपये काढून घेतले असल्याची घटना श्रीगोंद्यातील एसबीआयच्या एटीएम मध्ये घडली आहे.

याबाबत लोंढे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्या अज्ञात इसमा विरुद्ध भादवि कलम ४२० व ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नाईक खारतोडे या प्रकरणी तपास करीत आहेत. सदर गुन्हा पोलिस सहाय्यक फौजदार नवले यांनी दाखल केला आहे.

स्रोत: (पोलीस ठाण्यात दाखल तक्रार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading