दिनांक ३ मे २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि अधिकारी निवडणूक कार्यक्रमात इतके व्यस्त झाले आहेत की, कार्यक्षेत्रातील नागरिकांचे नमुद कार्यालयातील संबंधित कामं करण्यासही अधिकारी, कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. तर, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील कर्मचारी निवडणुकीच्या नावाखाली मोबाईल मध्ये गर्क असल्याचे एका जबाबदार पदाधिकाऱ्यानी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज संदिप उमाप (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग) हे तहसील कार्यालय येथे फेर फार घेऊन गेले असता, जास्त डॉक्युमेंट्स असल्याने माझा वेळ वाया घालू शकत नाही. असे निवासी नायब तहसीलदार खोमणे साहेब बोलल्याचे संदीप उमाप यांनी माध्यमांना सांगीतले. उमाप यांनी त्या अधिकाऱ्याला विनंती केली असतां ते म्हणाले तुम्ही माझ्या स्टाफचा भाग नाहीत. म्हणून, मी तुम्हाला लगेच सह्या करून देवु शकत नाही.
यापुढे जवळपास दीड तास थांबून देखील साहेबांनी कामं न करत उडवाउडवीची उत्तरे दिली व सह्या ही केल्या नाहीत.. मी एका संघटनेचा जबाबदार पदाधिकारी असतानाही स्थानिक तहसिल कार्यालयातील अधिकारी माझे हे सनदशीर कामं करण्यासाठी इतका वेळ लावतात. प्रसंगी निवडणूकीच्या नावाखाली माझे कामं करण्यास टाळाटाळही केली. तर, सर्वसामान्य लोकांचे कामं होत असेल का..? असा प्रश्न उपस्थित झाल्याने उमाप यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयात संपर्क करीत या अधिकाऱ्याची तक्रार केली. तसेच श्रीगोंदा तहसिलदार क्षितिजा वाघमारे यांनाही संपर्क करीत नमुद अधिकाऱ्याची तोंडी तक्रार केली.
तहसिल कार्यालयात उभे असता साहेबांचे फोन सुरू होते.. तेवढ्याच वेळात जर सह्या केल्या असत्या.. तर, माझे काम झाले असते.. असे कित्येक सर्वसामान्य लोकं या निवडणुकीच्या कामामुळे त्रस्त झाले आहेत. निवडणुकीच्या नावाखाली अधिकारी सर्वसामान्यांची हेळसांड करत असल्याचा आरोप संदीप उमाप यांनी केला आहे. तर, तहसीलदार मॅडम यांना फोन वर बोललो असता निवडणुकीमुळे जवळ जवळ सर्व प्रशासकीय कामे बऱ्यापैकी बंद आहेत. असे तहसीदार यांनी सांगितले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
