डॉ.सुजय विखेंसाठी आरपीआय मैदानात.: राजाभाऊ जगताप

दिनांक ३ मे २०२४, श्रीगोंदा:

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आरपीआय तालुका अध्यक्ष राजाभाऊ जगताप यांच्या शिष्टमंडळाने तालुक्यातील गाव न गाव पिंजून काढत प्रचारात आघाडी घेतली असून, घोगरगाव येथे आले असता माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राजाभाऊ जगताप म्हणाले, आरपीआय दिवस-रात्र एक करून डॉ सुजय विखे यांना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेत पाठवणारच असा निश्चय आरपीआय ने केलेला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून श्रीगोंदा तालुक्यात वाड्या, वस्त्या, गाव न गाव पिंजून काढत आहे. आजच्या दौऱ्यात घुगल वडगाव, मांडवगण, घोगरगाव, थीटे सांगवी, मढे वडगाव येथील कार्यकर्ते आणि जनमानसात जाऊन भेटी घेतल्या. डॉ सुजय विखे यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आणि महायुतीच्या सरकारने केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांना आवाहन करत आहोत. मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. यावरून विश्वासच नाही तर, खात्री झाली आहे. डॉ सुजय विखे विजयी होणारच आहेत.

मांडवगण येथे विखे समर्थक ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर देशमुख व शिर्डीचे नगराध्यक्ष अभय शेळके, शिवसंग्रामचे नेते मच्छिंद्र सुद्रिक, महादेव भोसले (ग्रा.सदस्य थिटे सांगवी), संदेश शिंदे (ग्रा.सदस्य मांडवगण) समवेत सविस्तर चर्चा करून निवडणुकी संदर्भातील पुढील गणनीती संदर्भात चर्चा झाली.

यावेळी RPI चे तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, पृथ्वीराज साळवे, मयूर ससाने, कपिल घोडके, मनोज ससाने, रोहित घोडके, डॅम साळवे, भारत कांबळे, सचिन चव्हाण, हरीश ससाणे, सचिन घोडके, साहिल भोसले, योगेश घोडके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading