ऊच्चवर्णीय समाजाकडूनच दिन-दलितांच्या (Atrocity) या हक्काच्या कायद्यावर गदा: बापू माने यांचा गंभीर आरोप…

दिनांक ३० डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:

सामाजिक न्यायासाठी काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते बापू माने यांनी दिन-दलित आणि गोरगरीबांवर होणाऱ्या अन्यायाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, काही समाजघटक अजूनही गोरगरीब, दलित आणि त्यांचा संरक्षण कायदा संपवण्याचा व त्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

“काही राजकिय लोक आजही आपल्या उच्चवर्णीय असण्याचा गैरफायदा घेत गरीब, दिन-दलित यांना वंचित ठेवण्यासाठी Atrocity कायद्यावर गरळ ओकन्याचा प्रयत्न करत आहेत. दिन-दलितांच्या मोक्याच्या प्रॉपर्टी लाटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कटकारस्थान आखले जात आहेत. हा प्रकार थांबवला गेला पाहिजे. ॲट्रॉसिटी कायद्याचा काहीजण गैरवापर करतात, हे मान्य आहे, पण या कायद्याची गरज अजूनही तितकीच आहे,” असे माने म्हणाले.

माने यांनी समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचे आवाहन केले. “या प्रकारांवर प्रश्नचिन्ह उभे करणे हे केवळ सामाजिक कार्यकर्त्यांचेच नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सरकारने आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गोरगरीब आणि दिन-दलितांना न्याय मिळवून देणाऱ्या Atrocity कायद्या अंतर्गत ठोस पावले उचलली पाहिजेत,” असे ते म्हणाले.

या मुद्द्यामुळे अनेक सामाजिक व पुरोगामी संघटनांनीही माने यांच्या मतांशी सहमती दर्शवली आहे. आगामी काळात या विषयावर अधिक जनजागृती मोहिमा राबवण्याचा इशाराही माने यांनी दिला आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading