जप्त वाहनांचा लिलाव २ जानेवारीला..

दिनांक ३० डिसेंबर २०२४,अहिल्यानगर:

तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीत अडकलेल्या वाहनांच्या मालकांनी शासनाने ठोठावलेली दंडात्मक रक्कम न भरल्याने संबंधित वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, अहिल्यानगर येथील गंगा उद्यानाच्या मागील भागात आयोजित करण्यात आला आहे.

तहसीलदार संजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. लिलाव होणाऱ्या मालमत्तांची किंमत, अनामत रक्कम, तसेच लिलावाच्या अटी व शर्तींची संपूर्ण माहिती कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल.

लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी अर्ज सादर करणे बंधनकारक असून, इच्छुकांनी अटी व शर्तींचा अभ्यास करून अर्ज दाखल करावा. या लिलावातून शासनाला होणाऱ्या महसूल वसुलीसह प्रशासनाची कारवाई प्रभावीपणे पुढे नेण्याचा उद्देश आहे.

तालुक्यातील नागरिकांनी या लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

स्रोत:(DIO)

जाहिरात…

टीप:प्रतीकात्मक फोटोचा वापर ..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading