अजनुज येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चोरीचा प्रयत्न..

दिनांक १० जुलै २०२४ अजनुज, श्रीगोंदा:

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अजनुज शाखेत अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. शाखा अधिकारी महादेव दगडु बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ९ जुलै २०२४ रोजी रात्री १:४५ वा.च्या सुमारास बँकेत बसवलेल्या सायरन सिस्टीम वाजल्यानंतर गावातील लोकांच्या साहाय्याने बँकेच्या गेटजवळ चोरीचा प्रयत्न झाल्याचे आढळले.

शाखा अधिकारी बोराडे यांच्या मते, अज्ञात चोरट्यांनी बँकेचे गेट तोडून नुकसान केले आणि सायरन सिस्टीम, सीसीटीव्ही सिस्टीम, वायर सिस्टीम, वायरलेस सिस्टीम, सेंसर सिस्टीम व पॉवर केबल सिस्टीम इत्यादी उपकरणे तोडून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच तिजोरी तोडण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, बँकेतून कोणतीही चीजवस्तू चोरीस गेली नाही.

शाखा अधिकारी बोराडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व ६५ नुसार गून्हा दाखल करण्यात आला आहे. तर, निरिक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालु आहे.

स्रोत:(फिर्याद)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading