ट्रक चालकाचा मोबाईल चोरीप्रकरणी ३ चोरटे पकडले; पोलीस-पाटील आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा टळला..

दिनांक ५ जुलै २०२५, श्रीगोंदा:

दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास नगर-दौंड महामार्गालगत लोणी व्यंकनाथ गावच्या शिवारातील महालक्ष्मी पेट्रोलपंपाजवळील हॉटेल रंगीला परिसरात मोबाईल चोरीची घटना घडली. एका ट्रक चालकाने ट्रक उभा करून मोबाईल चार्जिंगला लावून विश्रांती घेतली होती. दरम्यान, ३ ते ४ चोरटे त्या ठिकाणी आले व ट्रक मधून मोबाईल चोरून पळण्याचा प्रयत्न केला.

मोबाईल चार्जिंग डिस्कनेक्ट झाल्यामुळे बीप वाजल्याने चालक अचानक जागा झाला आणि त्याने आरडाओरड केली. चोरटे धाव घेत असतानाच त्यांनी ट्रक चालकावर दगडफेक केली. हा प्रकार समजताच लोणी व्यंकनाथ गावचे पोलीस पाटील मनेश जगताप यांनी तत्काळ नागरिकांच्या मदतीने चोरट्यांचा पाठलाग केला.

पाठलागाच्या दरम्यान चोरट्यांची मोटरसायकल अपघातग्रस्त झाली. त्याचवेळी API निकम, पोना भागवत, मनोज साखरे व चालक साळवे हे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पाटील आणि नागरिकांच्या मदतीने मोठ्या शिताफीने ३ चोरटे पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

घटनास्थळी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. चोरी गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. पळून जात असताना अपघात झाल्याने आरोपी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाच्या फिर्यादीवरून संबंधित चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

स्तोत्र:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading