दिनांक १० जुलै २०२४, मांडवगण/श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील काही नामांकित हॉस्पिटल्स आणि त्यांच्या ठराविक एजंट्स यांच्या विरोधात भक्कम पुरावे मिळवून, निलेश लंके प्रतिष्ठानच्या मांडवगण गटाध्यक्ष अमोल बोरुडे लवकरच इन्शुरन्स घोटाळे उघडकीस आणणार आहेत. हे हॉस्पिटल्स आणि एजंट्स खोट्या ट्रीटमेंट दाखवून फेक पद्धतीने हेल्थ इन्शुरन्स क्लेम करत असल्याचे सिद्ध होत आहे.
अनेक लोक आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मेडिकल हेल्थ इन्शुरन्स घेतात, जेणेकरून भविष्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची वेळ आल्यास त्याचा फायदा होईल. १० ते २० हजार रुपये भरून ५ लाख ते २० लाखांपर्यंतचा मेडिकल ट्रीटमेंट खर्च हा इन्शुरन्सद्वारे भरला जातो. पण, श्रीगोंदा तालुक्यातील काही नामांकित हॉस्पिटल्स या योजनेचा गैरफायदा घेत आहेत. हे हॉस्पिटल्स लाभार्थ्यांना ५०% ते ६०% पैसे देऊन उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवत आहेत. यात काही एजंट्सचीही सहभागिता आहे.
हा फसवणुकीचा प्रकार सिद्ध करण्यासाठी अमोल बोरुडे यांनी कायदेशीर मार्गाने पुरावे गोळा केले आहेत. कायदे सर्वांसाठी समान आहेत हे दाखवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






