धर्मवीर गड किल्ला संवर्धनासाठी संयुक्त चर्चा व पाहणी; आमदार पाचपुते व पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती..

दिनांक १६ मार्च २०२५, पेडगाव, ता. श्रीगोंदा:

पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील ऐतिहासिक धर्मवीर गड किल्ल्याच्या संवर्धन व विकास आराखड्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभाग व राज्य पुरातत्त्व विभाग यांच्या समवेत संयुक्त चर्चा आमदार श्री. विक्रमजी बबनराव पाचपुते यांनी केली. तसेच गडाची पाहणी करून त्याच्या जतन व विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

यावेळी पुरातत्त्व विभाग संभाजीनगरचे श्री. शिवकुमार भगत साहेब, पुरातत्त्व विभाग नाशिकचे अमोलजी गोटे साहेब, तहसीलदार क्षितिजा वाघमारे मॅडम (श्रीगोंदा), कार्यकारी अभियंता जाधव साहेब (अहिल्यानगर), गटविकास अधिकारी राणीताई फराटे (श्रीगोंदा), उप अभियंता होके साहेब आणि आर्किटेक्ट देशमुख मॅडम उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील शिवप्रेमी, इतिहासप्रेमी, तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडाच्या संवर्धनाबाबत धोरण ठरविण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा विकास करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.

आगामी काळात धर्मवीर (बहादूर) गडाचा कायापालट होऊन तो पर्यटकांसाठी एक ऐतिहासिक व सांस्कृतिक आकर्षण ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

स्रोत:(राजेंद्र उकांडे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading