दिनांक १० जुलै २०२४, श्रीगोंदा:
वाय. एस. एम. इन्फो. सोल्यूशन या कंपनीने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सोनिया गांधी पॉलिटेक्निक मधील संगणक विभागाच्या २१ विद्यार्थ्यांची निवड झाली. कंपनीने महाराष्ट्र पातळीवरती स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये १०,००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते व ३५० पेक्षा अधिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये ५० विद्यार्थ्यांची निवड कंपनी मार्फत करण्यात आली, या ५० विद्यार्थ्यांमध्ये २१ विद्यार्थी सोनिया गांधी पॉलिटेक्निक मधील संगणक विभाग श्रीगोंदा यांचे आहेत. या स्पर्धेमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवून बक्षीसास पात्र ठरले.
या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र (दादा) नागवडे, संस्थेच्या सचिव सौ. अनुराधाताई नागवडे, कॉलेजचे इंस्पेक्टर श्री. गोलांडे सर, कॉलेजचे प्राचार्य श्री. अमोल नागवडे सर, विभाग प्रमुख प्रा. प्रताप नागणे सर यांनी तसेच सर्व विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






