तहसील कार्यालयासमोर भव्य बोंबाबोंब आंदोलन, संविधान गटाची मागणी मान्य करण्याचे आश्वासन..

दिनांक ११ जुलै २०२४, श्रीगोंदा:

सावित्रीबाई फुले संविधान गट आणि संजीवनी संविधान गटाच्या वतीने आज गुरुवार, दिनांक ११ जुलै २०२४ रोजी तहसील कार्यालय ते पंचायत समिती कार्यालय ढोल ताशा आणि आंदोलन करीत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी संविधान गटाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन तहसीलदार क्षितिजा वाघमारे मॅडम यांनी दिले. तर, सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी ताबडतोब बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

आंदोलकांनी सांगितले की, मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेट्रोल व डिझेल अंगावर टाकून आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी संविधान गटाच्या बेलवंडी व घारगाव येथील सर्व महिला उपस्थित होत्या.

आंदोलनात आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, घोटवी गावचे सरपंच अविनाश चव्हाण, बेलवंडी गावचे चेअरमन राहुल भोसले, बहुजन भीम सेनेचे प्रदेशाध्यक्ष सावकार जी भोसले साहेब, संविधान प्रचारक सुनील ओहोळ आणि संविधान गटातील महिला ताराबाई वायदंडे, संगीता ताई धोत्रे, शर्मिला गायकवाड, पुनम गायकवाड, धीरज भोसले, स्वप्निल पवार, अशोक मोरे, रामसिंग भोसले, भाऊ पवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

आदिवासी पारधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले यांनी सांगितले की, मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्यात येईल.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading