सरकारी मोजणी होऊनही हद्दनिश्चित करण्यास टाळाटाळ.. भूमी अभिलेख कार्यालयाविरोधात दि.७ डिसेंबर रोजी उपोषण

दिनांक ३ डिसेंबर(मढेवडगाव,श्रीगोंदा):

मढेवडगाव येथील गट नं. ३९१ ची सरकारी मोजणी होऊनही हद्दी खुणा करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून वेगवेगळी कारणे सांगूनही टाळाटाळ होत असल्याने, अर्जदार संजय बापू कोरे व विजय धोंडीबा जगताप हे सोमवार दिनांक ७ रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार आहेत.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याबाबत अर्जदारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील गट नं.३९१ मध्ये आमचे क्षेत्र आहे. या गटाची सरकारी मोजणी व हद्दीखुणा करण्यासाठी नियमानुसार उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे शुल्क भरले होते. त्याप्रमाणे दिनांक ९ सप्टेंबर २०२० रोजी क्षेत्राची मोजणी झाली. मोजणी झाल्यानंतर हद्दी खुणा कायम करण्यासाठी कार्यवाही करणे आवश्यक होते. वारंवार समक्ष भेटून व लेखी मागणी करूनही उपअधीक्षक कार्यालय श्रीगोंदा येथील संबंधित अधिकारी व कर्मचारी मोजणी नकाशाची ‘क’ पत्रक देण्यास टाळाटाळ करून मागील तीन महिन्यांपासून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.तर, हद्दी खुणा करून देण्यास जाणूनबुजून विलंब करत आहेत. असा आरोप अर्जदार संजय बापू कोरे व विजय धोंडीबा जगताप यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.

हद्दी खुणा दर्शविण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व अन्यथा सोमवार दिनांक ७ डिसेंबर रोजी निवेदनात म्हटल्याप्रमाणे उपोषणाचे तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. निवेदनाच्या प्रती जमावबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे, उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अहमदनगर, तहसीलदार श्रीगोंदा, उपअधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा व पोलीस निरीक्षक श्रीगोंदा यांना देण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय कार्यालये दलालांच्या विळख्यात:

श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाला दलालांचा विळखा पडलेला आहे. सर्वसामान्य जनतेचे कुठलेही कामे वेळेवर होत नाहीत. अशा प्रकारच्या बऱ्याच तक्रारी पुढे येत आहेत. अधिकारी व कर्मचारी राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे चित्र नेहमीचेच आहे. कोणते काम पळवायचे व कोणते रखडावायचे हे नेत्यांच्या मर्जीनुसार ठरते, अशी चर्चा आहे. मढेवडगाव येथील याच कालावधीतील काही प्रकरणे मोजणी होऊनही वेगवेगळी कारणे सांगून प्रलंबित ठेवण्याचे काम या कार्यालयाकडून होत आहे.

स्रोत:(पत्रकार विजय उंडे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading