दिनांक ३ डिसेंबर,श्रीगोंदा:
इपीएस राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने श्रोगोंदा तहसीलदारांना इपीएस ९५ पेन्शन धारकांना अन्न सुरक्षा अंतर्गत अन्नधान्य, आरोग्य सुविधा मिळणेसाठी सादर करण्यात आलेल्या निवेदनावर निर्णय न झाल्याने, संघटनेच्या वतीने संघटना उपाध्यक्ष संपत समिंदर व भगवंत वाळके हे दिनांक ७ डिसेंबर रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती संघटनेच्या माध्यमातून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

स्थानिक प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २५ फेब्रुवारी २०२० रोजी या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. दिनांक ३० मार्च रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी मार्फत श्रोगोंदा तहसील कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे.त्याप्रमाणे आवश्यक माहिती सर्व १७५ पेन्शन धारकांची माहिती फॉर्ममध्ये भरून दिली. ७ ते ८ महिने झाले तरी, अद्याप कार्यवाही नाही. १५ दिवसापूर्वी व १ डिसेंबर रोजी पुरवठा शाखेत चौकशी केली असता परत फॉर्म भरून द्यावे लागतील.प्रत्येकाने फॉर्म भरावा असे सांगितले. प्रत्येकाने फॉर्म भरायचा त्यासाठी १० हेलपाटे मारायचे त्यामुळे १ वर्षाचा कालावधी लागेल. कोरोना काळात आम्हाला उपाशी मरावेच लागले आहे. तर, श्रीगोंदा तहसील कार्यासमोर मरू असा निर्धार महाराष्ट्र उपाध्यक्ष संपत समिंदर,तालुकाध्यक्ष भगवंत वाळके यांनी केला आहे.
उपोषणाच्या दिवशी संघटनाचे तालुक्यातील सर्व पेन्शनर्स पाठींबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. असे अध्यक्ष सुभाष पोखरकर व उपाध्यक्ष संपत समिंदर यांनी सांगितले.
स्रोत:(संपत समिंदर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
