मढेवडगांव येथे कोरोनाविषयी जनजागृती आणि मार्गदर्शन अभियान..

दिनांक १९ सप्टेंबर(मढेवडगाव/श्रीगोंदा):

तालुक्यात कोरोना व्हायरसच्या भीतीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण कार्यालये ओस पडली आहेत. रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. या कोरोना रोगाच्या व्हायरस विषयी तालुका आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. खामकर व त्यांची टीम मढेवडगांव परिसरात व सर्व वाड्या-वस्त्यांवर जाऊन जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

यासाठी “कोरोना या रोगाविषयी मार्गदर्शन शिबीरामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव या गावात मार्गदर्शन करताना डॉ. खामकर म्हणाले की, या रोगावर लस जरी उपलब्ध झाली नसली तरी, योग्य खबरदारी घेतल्यास या भयंकर व्हायरस रोगावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,प्रवास सध्या टाळलं तरी चालेल. असे उपस्थित जनतेस मार्गदर्शन करताना डॉ. नितीन खामकर बोलत होते.

यावेळी डॉ. गवते, डॉ. मोरे, डॉ. अभय शिंदे, डॉ. महावीर भंडारी, डॉ. प्रवीण नलगे, डॉ. पूजा लोखंडे, या सर्व गावातील डॉ.मंडळींनी उपस्थित जनतेस कोरोना विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. सरपंच महानंदा मांडे, उपसरपंच जयश्री भगवान धावडे, प्रा.फुलसिंग मांडे, जिजाबापू शिंदे, अंबादास मांडे, गेना मांडे, बबनतात्या उंडे, भगवान धावडे, लक्ष्मण मांडे, सचिन उंडे, गायकवाड भाऊसाहेब, दिपक गाडे, अमोल गाढवे, गणेश मांडे,काळूराम ससाणे, बापू बर्डे, राहुल साळवे, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात महिला, तरुण, बालके आणि वयोवृद्ध यांची उपस्थिती होती. श्रीगोंदा तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने करोना रोगाविषयी मढेवडगांव येथे मार्गदर्शन शिबीर घेऊन या रोगाची भीती लोकात घर करून बसली आहे. त्यामुळे जनजागृती करणे आवश्यक आहे हे कर्तव्य समजून मढेवडगांव येथील सरपंच महानंदा फुलसिंग मांडे यांनी दाखवून दिले आहे.

तालुक्यात प्रत्येक गावोगावी सध्या कोरोना रोगाविषयी जनजागृती करण्याची गरज बनली आहे. यामुळे बाजारपेठा थंडावल्या आहेत. कोणीही आपल्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेर पडत आहेत. अशी स्थिती संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी दिसून येत नाही. धार्मिक स्थळी सुद्धा गर्दी दिसून येत नाही. या रोगावर लस जरी उपलब्ध नसली तरी योग्य खबरदारी घेतल्यास या रोगावर अटकाव बसू शकतो. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक आहे.

“गर्दीच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असो की, लग्न सभारंभ असो अश्या ठिकाणी गर्दी करून करोना व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव होतो आहे. तो पर्यंत तरी अशा ठिकाणी एकत्र येणे टाळणे गरजेचे असून, सर्वांनी सहकार्य करावे लागते.असे मत डॉ.महावीर भंडारी यांनी व्यक्त केले आहे.”

“व्यापारी सुद्धा या व्हायरस पासून परेशन आहेत. दुकानात ग्राहक नाहीत. तरी पण यावर आरोग्य विभाग दक्षता घेऊन रोग प्रतिबंध उपाय शोधून काढेल पाहिजेत. मग आमचे सुद्धा व्यवहार सुरळीत होतील अशी आशा मढेवडगांव येथील प्रतिष्टीत व्यापारी अण्णासो झुंजरूक यांनी प्रतिक्रिया देतांना व्यक्त केली.”

स्रोत:(विजय मांडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading