दिनांक १६ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
शहरातील सिद्धार्थनगर मध्ये काही वर्षांपूर्वी समाज मंदिराच्या चावडीमध्ये बसवण्यासाठी आणलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती दगडाचा पुतळा बऱ्याच दिवसांपासून अडगळीत धूळ खात पडलेला आहे. त्याच्या आसपास धूळ, माती, दगड, गवत असे घाणीचे आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सन्मानाची शिकवण देणाऱ्या महापुरुषाच्या पुतळ्याला घाणीच्या विळख्यात ठेऊन पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करीत मोठं मोठ तत्वज्ञान सांगणासाठी येणाऱ्या वक्त्यांसह समाजातील सामाजिक, राजकिय अभिसरण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही हे सर्व दिसू नये.! हे मात्र, दुर्भाग्यपूर्ण आहे.!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिद्धार्थनगर श्रीगोंदा येथे अनेक वर्षांपूर्वी लोक वर्गणीच्या माध्यमांतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिकृती पुतळा बसवण्यासाठी आणला होता. मात्र, तांत्रिक अडचनींमुळे तो नियोजित ठिकाणी बसवण्यात आला नाही. यानंतर सदरील समाज मंदिर पाडून त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून भव्य स्मारक उभारण्यात आले. तरीही तो पुतळा आजही सर्वांपासून दुर्लक्षित एका पडक्या दार नसलेल्या खोलीमध्ये ठेवलेला असून, आसपास घाणीने विळखा घातलेला आहे. तसेच, उगवलेले गवत, अस्ताव्यस्त पडलेली माती व रोज फिरस्थ्या कडून होणाऱ्या कचऱ्यात उभ्या असलेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिकृती पुतळा समाज बांधवांच्या नजरेपासून दुर्लक्षित असल्याचे दिसत आहे.
ऐनवेळी सामाजिक तत्वज्ञानाच्या आणि राजकीय प्रक्रियेच्या बाबी व समाजासमोर आचरनाचे धडे मांडणारे राजकीय व सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील तत्त्ववेत्ते, मान्यवर, संघटना व समाज बांधव या अक्षम्य चूकीकडे दुर्लक्ष का करत आहेत.? हे समजू शकले नाही..

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजरा करणारे समाज बांधव व लोकप्रतिनिधी डॉ.आंबेडकरांचा प्रतिकृती पुतळा आडगळीत धूळ खात असतांना, नजरंदाज करणे चुकीचे आहे. नमूद अवस्था पाहून परिसर स्वच्छता करून, याबाबत निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. अन्यथा आचरणाचा आव आणणाऱ्यांपेक्षा वास्तविक आचरण करणारे समाजात, तालुक्यात व जिल्ह्यात कमी नाहीत..! कारण हे कृत्य महापुरुषांचे विचार पायदळी तुडवण्या इतकेच गंभीर आहे…!
स्त्रोत:(सिद्धार्थ नगर श्रीगोंदा येथील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याची सद्यपरिस्थितीत)

