दरोड्याच्या तयारीतील गुन्ह्यात अटक आरोपींकडुन ४९ हजार रुपये किंमतीचे पाँवर फिडर, वायर, तांबे हस्तगत करुन, ३ गुन्हे उघड..! श्रीगोंदा पोलीसांची कारवाई..

दिनांक १५ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

दिनांक १६ जुलै २१ रोजी फिर्यादी दिनेश सदानंद पडवळे रा.रोहा जि.रायगड ह. रा. घारगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनर यांनी फिर्याद दिली की, कालीया प्रोजक्ट कंपनीचे सी.एन.जी.गॅस कंपनीचे काम श्रीगोंदा ते काष्टी रोडवर शेंडगेवाडी शिवारात चालु असतांना आयडर कंपनीची वेल्डींग केबल तिची जाडी ५० SQUR ची ५००/मीटर वायर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भा.द.वि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या सुचनांवरुन दरोड्याचे तयारीतील गुन्ह्यात अटक आरोपी परमेश्वर उर्फ परमेश वैयशा भोसले वय २५ वर्षे, रा.भेडाळा ता.गंगापुर जि.औरंगाबाद, सचिन अशोक जाधव वय २४ वर्षे रा.प्रवरासंगम ता. नेवास जि. अहमदनगर, महेश रामकिसन धोत्रे वय २१ वर्षे रा.प्रवरासंगम ता. नेवासा जि. अहमदनगर, राजु शिवाजी जाधव वय २७ वर्षे रा. भेंडाळा ता. गंगापुर जि. औरंगाबाद यांचे कडुन गुन्हे उघडकीस आणुन त्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 1 )

श्रीगोंदा पोलीस स्टेशन भा.द.वि.क. ३७९ मधील गुन्हयातील चोरीस गेलेले ४०००/ – किंमतीचे तांबे हस्तगत, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन जि.जळगाव भा.द.वि.क. ४५७, ३८० मधील चोरलेली ADINATH कंपनीचे POWER WEEDER शेती अवजारे किंमत ३०,०००/ – रु. किंमतीचे, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन जि. जळगाव भा.द.वि.क. ४६१, ३८० मधील चोरलेले तांबे २५ किलो किंमत १५,०००/ – रु., नेवासा पोलीस स्टेशन भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्ह्यांची कबुली दिली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आसुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गोकुळ इंगवले हे करीत आहेत.

सदरची कारवाई (मा.पोलीस अधिक्षक) श्री.मनोज पाटील साहेब, (मा.अप्पर पोलीस अधिक्षक) सौरभकुमार अग्रवाल साहेब, (मा.उपविभागीय पोलीस अधिकारी) श्री.अण्णासाहेब जाधव साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे (पोलीस निरीक्षक) श्री.रामराव ढिकले, (सपोनि) दिलीप तेजनकर, (सफो.) अंकुश ढवळे, (पोना) गोकुळ, इंगवले, (पोकॉ) प्रकाश मांडगे, (पोकॉ) किरण बोराडे, (पोकॉ) दादा टाके, (पोकॉ) अमोल कोतकर, (पोकॉ) प्रशांत राठोड यांनी केली आहे.

स्रोत:(प्रेसनोट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading