जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण; काष्टीच्या महालक्ष्मी चौकातील प्रकरण..!

दिनांक ४ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

काष्टी महालक्ष्मी चौक येथे घडलेल्या एका घटनेत, ज्योती बाळासाहेब साठे (वय २१) या युवतीवर जातीवाचक शिवीगाळ करून शारीरिक मारहाण करण्यात आली. तिच्या तक्रारीनुसार, ही घटना १९ जुलै २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता घडली.

ज्योतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती आणि तिचे वडील बाळासाहेब साठे मजुरी करून उपजीविका भागवतात. त्यांच्या घराच्या शेजारील मोकळ्या जागेत शेजारी राहणारे योगेश बिभीषण मिसाळ, मनिष बिभीषण मिसाळ, जयश्री योगेश मिसाळ आणि सावित्राबाई बिभीषण मिसाळ यांनी त्यांच्या वाहनांचे पार्किंग केले होते. ज्योतीने त्यांना सेंप्टी टॅंक खराब होईल म्हणून गाड्या लावू नका असे सांगितले असता, त्यांनी संतापून ज्योतीला जातीवाचक शिवीगाळ केली आणि शारीरिक मारहाण केली.

या घटनेत योगेश, मनिष, बालाजी, जयश्री आणि सावित्राबाई मिसाळ यांनी ज्योतीला फरफटत ओढून मारहाण केली. मनिषने लाकडी काठीने तिच्या उजव्या हातावर मारले. तर, जयश्रीने दगडाने पाठीवर मारले. ज्योतीने पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर तिला प्रथम उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा आणि नंतर सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर येथे पाठविण्यात आले.

यात पोलिसांनी Atrocity नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नमुद घटनेत परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. Atrocity तील दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले असुन, याप्रकरणी काष्टी गावातील बहुतांश लोकं मिसाळ कुटुंबीय निर्दोष असल्याचे बोलत आहेत. तर, पीडित साठे कुटुंब वारंवार लोकांशी वाद घालत असल्याचे समजते आहे.

स्रोत:(फिर्याद व मिळालेल्या माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading