दिनांक ४ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील ग्रामदैवत बोडखेश्वर मंदिरात त्रिदिनी सप्ताहाच्या निमित्ताने वैष्णव मेळावा व गुरुपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात श्रीमद् भागवत गीता पारायण, गोशाळा भूमिपूजन, सभागृह भूमिपूजन, ग्रंथालय उद्घाटन व वृक्षारोपण यांसारख्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्या व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने, श्रावण मासाच्या शुभ मुहूर्तावर हे कार्यक्रम होत आहेत.
या सप्ताहाचे आयोजन प. पु. मलुकपीठाधीश्वर द्वाराचार्य राजेंद्रदासजी महाराज श्रीधाम वृंदावन, प. पु. गोवत्स राधाकृष्णजी महाराज (जोधपूर राजस्थान), प. पु. गु महंत भास्करगिरी महाराज, प. पु. गु शांतिब्रम्ह मातोरी (बाबा) कुरेकर (सद्गुरु जोग महाराज संस्था – आळंदी), सा.कार्यकर्ते श्री पद्मभूषण अण्णा हजारे आणि भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. हा त्रिदिनी सप्ताह सोमवार, ५ ऑगस्ट २०२४ ते बुधवार, ७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे.
७ ऑगस्ट रोजी प. पु. गु महंत भास्करगिरी महाराज यांचे सकाळी ९ ते ११ या वेळेत काल्याचे किर्तन होईल, त्यानंतर ह. प. घनश्याम (अण्णा) शेलार यांच्या तर्फे काल्याचा महाप्रसाद दिला जाईल. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन श्री बोडखेश्वर देवस्थान व ग्रामस्थ शिरसगाव बोडखा यांनी केले आहे.
प्रमुख संत-महंत उपस्थित:
* निंबराज महाराज संस्थान देवस्थान देवदैठण
* संत शेख महंमद महाराज पालखी सोहळा श्रीगोंदा
* संतराज महाराज संस्थान संगम – वाळकी बेट
* गुरुवर्य तात्यामहाराज महापुरुष सेवा मंडळ
* सद्गुरु श्री प. पु. आनंदाश्रम स्वामी सुरेगाव
* कीर्तनकार, मृदंगाचार्य, गायनाचार्य, कथाकार आणि वारकरी संप्रदाय.
स्रोत:(पत्रकार आदेश उबाळे)





