बेलवंडी पोलिसांची मोठी कारवाई; नदीकाठच्या हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त.

दिनांक १८ डिसेंबर २०२५श्रीगोंदा:

बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माठ गावात नदीपात्रालगत सुरू असलेल्या हातभट्टी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्यांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत दारुसाठी लागणारे कच्चे रसायन व तयार दारू, तसेच साहित्य, असा एक लाख १२ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

या कारवाईत दीपक भास्कर पवार, रामदास प्रकाश पवार, अंकुश तानाजी पवार व संतोष तानाजी पवार (सर्व रा. माठ, ता. श्रीगोंदा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

https://www.amazon.in/dp/B0FNDDRLZ2/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_dl_9DHEBVVY7SNS1RHETTY0?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=07d7484f1583c890c02d85c4741f58c1

बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माठ गावाजवळ घोड नदीच्या पात्रालगत दीपक पवार, रामदास पवार, अंकुश पवार व संतोष पवार मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती बेलवंडी पोलिसांना मिळाली.

त्या अनुषंगाने पोलिसांनी या ठिकाणांवर कारवाई केली. या कारवाईत कच्चे रसायन, तयार दारू, तसेच साहित्य असा एक लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शरद गांगर्डे, विनोद पवार, दादा क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading