दिनांक १८ डिसेंबर २०२५, शिरूर/श्रीगोंदा:
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बोराडे मळा परिसरात अजय माणिक घेगडे (वय २०) या तरुणावर ८ ते १० जणांच्या टोळक्याने चाकू आणि कोयत्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात अजय गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

पीडित तरुण अजय घेगडे हा मूळचा श्रीगोंदा (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी आहे.
बोराडे मळा परिसरात अचानक आलेल्या टोळक्याने अजयवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले आणि त्यानंतर आरोपी फरार झाले.
जखमी अजयवर शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिरूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
