श्रीगोंदा पोलिसांची मोठी कारवाई: गावठी हातभट्टी दारू निर्मितीचा कट उघडकीस.. ५१.५ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त..

दिनांक २३ डिसेंबर २०२४ श्रीगोंदा (अहमदनगर):

मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या कटाचा पर्दाफाश करत श्रीगोंदा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ७२ हजार लिटर कच्चे रसायन, ५०० लिटर तयार गावठी दारू, तसेच उत्पादनासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. याची एकूण किंमत ५१,५९,०६०/- रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे.

पोलीस हवालदार संदीप पोपट राऊत यांच्या तक्रारीवरून २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६:०० वाजता श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पथकाने ठरलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करण्याच्या उद्देशाने संगनमत केल्याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

विशाल रावसाहेब पाचपुते (वय २३, राहणार काष्टी), दिपु राम विलास (वय ३५, राहणार सैदापूर, ता. सफीपुर, जि. उन्नाव, उत्तरप्रदेश),गणेश रामबालक शंकर (वय २२, राहणार मुठाह, ता. सफीपुर, जि. उन्नाव, उत्तरप्रदेश),मनोजकुमार रामपाल सिंग (वय ४५, राहणार खचीनखेडा, ता. सफीपुर, जि. उन्नाव, उत्तरप्रदेश), राहुल दामोदर बनसोडे (वय ३०, राहणार लोणी काळभोर, जि. पुणे, मूळ पत्ता- किनी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर)

सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहभाग घेतला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading