आमदार विक्रम पाचपुते यांच्या ॲट्रॉसिटी कायद्याबाबतच्या वक्तव्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात नाराजीचे वातावरण.. पहा व्हिडिओ…

दिनांक २२ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा/नगर तालुक्याचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबत विधिमंडळात केलेल्या विधानावरून तालुक्यातील विविध सामाजिक आणि पुरोगामी संघटनांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यांच्या विधानामुळे आंबेडकर चळवळीतील अनेक पदाधिकारी दुखावले गेले आहेत.

आमदार विक्रम पाचपुते यांनी हिवाळी अधिवेशनात श्रीगोंदा तालुक्यातील विकासकामांशी संबंधित अनेक मुद्दे मांडले. त्यामध्ये तालुक्यात वाढत चाललेल्या बिबट्यांच्या संख्येबाबतही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मात्र, ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबत केलेल्या विधानाने स्थानिक पातळीवर नवा वाद उभा राहिला आहे.

विधिमंडळात बोलताना विक्रम पाचपुते म्हणाले की, “ॲट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे उदाहरणे समोर आली आहेत.” या विधानामुळे श्रीगोंदा तालुक्यातील बहुसंख्य सामाजिक संघटनांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काहींच्या मते, असा सार्वत्रिक मुद्दा सभागृहात मांडणे चुकीचे होते.

आमदार विक्रम पाचपुते यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी ॲट्रॉसिटी कायदा चुकीचा आहे असे म्हटलेले नाही, मात्र या कायद्याचा गैरवापर होतो आहे हे मांडले आहे.”

श्रीगोंदा शहरात आणि तालुक्यातील काही भागांमध्ये आदिवासी समाजाच्या काही घटकांनी अतिक्रमण केल्याचे आरोप आहेत. श्रीगोंदा शहरातील नगरपालिकेची अभ्यासिका मागील १२ ते १५ वर्षांपासून अतिक्रमित आहे. या ठिकाणी अनधिकृतरित्या राहणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यास स्थानिक प्रशासन हतबल असल्याचे चित्र आहे.

रुईछत्तीसी येथेही अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास ॲट्रॉसिटीची धमकी दिली जाते, असा दावा करण्यात येत आहे. यामुळे कायद्याचा गैरवापर करून प्रशासनावर दबाव टाकण्याचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

नगरपालिकेची अभ्यासिका आदिवासीं समाजाच्या काही लोकांच्या अतिक्रमणाखाली असल्याने श्रीगोंदा येथील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सोयी सुविधांचा अभाव जाणवत आहे. मागील १० वर्षांपासून अभ्यासिकेच्या अतिक्रमणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. जर हे अतिक्रमण काढून अभ्यासिकेचा योग्य उपयोग झाला असता, तर अनेक विद्यार्थी उच्च पदांवर पोहोचले असते.

या प्रकरणावर आमदार विक्रम पाचपुते यांनी स्थानिक प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देणार असल्याचे पत्रकारांना सांगितले आहे. “संयुक्तिकरीत्या अतिक्रमण हटवण्यासाठी पुढाकार घेतला जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदारांच्या विधानामुळे तालुक्यातील विविध संघटनांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त करण्याची तयारी दर्शवली आहे. आंबेडकर चळवळीतील नेतेमंडळी या प्रकरणी अधिकृत भूमिका घेण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे समजते.

स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)

Video पहा: Atrocity कायद्याबाबत बोलतांना आमदार विक्रम पाचपुते

One thought on “आमदार विक्रम पाचपुते यांच्या ॲट्रॉसिटी कायद्याबाबतच्या वक्तव्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात नाराजीचे वातावरण.. पहा व्हिडिओ…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading