लिंपणगावातील अन्यायावर बापू माने आक्रमक; पाचपुते यांच्या भूमिकेवर सवाल…

दिनांक २३ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:

हिवाळी अधिवेशनात आमदार विक्रम पाचपुते यांनी ॲट्रॉसिटी कायद्याच्या वापराबाबत केलेल्या विधानामुळे sc st समाजात प्रचंड रोष उसळला आहे. दलित व मागासवर्गीय समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सामाजिक कार्यकर्ते बापू माने यांनही पाचपुते यांच्या विधानावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सामाजिक कार्यकर्ते बापू माने यांनी काष्टीजवळील लिंपणगाव येथे घडलेल्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, एका मागासवर्गीय कुटुंबावर अन्याय झाला असताना पाचपुते यांनी या प्रकरणाचा अधिवेशनात उल्लेख का केला नाही.?लिंपणगाव काष्टीपासून जवळ अंतरावर असून या प्रकरणाने समाजमन ढवळून निघाले होते.

नुकतेच पाचपुते यांनी आपल्या विधानात गांधी कुटुंबाला मिळालेल्या ॲट्रॉसिटीच्या धमक्यांचा उल्लेख केला. तसेच, लिंपणगावातील अन्यायाविषयी त्यांनी बोलायला हवं होते, असे बापू माने यांचे म्हणणे आहे. विशेषतः, हा अन्याय पाचपुते यांच्या मातोश्रींनी स्वतः पाहिला असल्याचा दावाही मानेंनी केला आहे.

सध्या पाचपुते यांच्यावर जातीय राजकारणाचा आरोप होत आहे. उच्चवर्णीय समाजाच्या बाजूने झुकून त्यांनी मागासवर्गीयांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. ॲट्रॉसिटी कायद्याला कमी लेखण्याचे हे विधान दलित समाजासाठी धोकादायक असल्याचे मानेंचे मत आहे.

माध्यमांशी बोलताना बापू माने यांनी स्पष्टपणे सांगितले की, लिंपणगाव प्रकरणातील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. ॲट्रॉसिटी कायद्याचे महत्त्व ओळखून त्याचा योग्य प्रकारे वापर होण्यासाठी प्रशासनाने पुढील पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading