भाजपा तालुका कार्यकारनी तर्फे पत्रकारांना सॅनिटायझरचे वाटप..

दिनांक ८ मे,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांकडून कोरोना प्रादुर्भावात प्रतिबंधासाठी पत्रकारांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.(तालुका अध्यक्ष) संदीप नागवडे,(शहर उपाध्यक्ष)राजू उकांडे,अनिल वाळके यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांना हे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील महसूल अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख तहसीलदार,पोलिस अधिकारी, आरोग्य अधिकारी सह त्यांचे कर्मचारी हे कोरोना आपत्तीमध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत.दरम्यान, संचारबंदी लागू झाली असल्याने घरात बसलेल्या सामान्यांपर्यंत प्रशासकीय सूचना व माहिती पुरवण्याचे काम पत्रकारां मार्फत केले जात आहे.पत्रकार हा प्रशासन/शासन व नागरिकांमधील दुवा असून,कोरोना संसर्गातील संपूर्ण माहिती रस्त्यावर उतरून पत्रकार संकलित करीत सामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत. जेवढी जिम्मेदारीने प्रशासन काम करत आहे.तेवढ्याच कार्यकुशलतेने पत्रकार आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे मत भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी यावेळी बोलताना मांडले. बातमीसाठी पत्रकार या आपत्ती मध्ये रस्त्यावर उतरून आपले काम पूर्ण करत आहेत.कोरोना संक्रमणापासून त्यांचे संरक्षण होण्यासाठी भाजपा तालुका कार्यकारनी पदाधिकाऱ्यांमार्फत पत्रकारांना सॅनिटायझर देण्यात आले आहे.

यावेळी,माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या माऊली संपर्क कार्यालयामध्ये सर्व पत्रकार उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश शिंदे (दैनिक दिव्य मराठी), (दैनिक केसरीचे) उत्तम राऊत, (नगर सह्याद्रीचे) राजेंद्र राऊत, (दैनिक जनप्रवासचे) अंकुश तुपे,(अधिराज्यचे) भालचंद्र सावंत, (दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे) दादासाहेब सोनवणे, (दैनिक सार्वमत), शिवाजी साळुंके (दैनिक युवाध्येयचे) नितीन रोही सह इतर पत्रकार उपस्थित होते.

तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे यांनी यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading