दिनांक २६ मे, श्रीगोंदा:
मानवतेला शांती, करुणा, समता, ममता आणि माणुसकीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंती दिनानिमित्त आज श्रीगोंद्यातील सिद्धार्थनगर मधील बांधवांच्या पुढाकाराने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. श्रीगोंदा तालुक्याचे (तहसीलदार) प्रदीप पवार, पंचायत समितीचे (बिडिओ) प्रशांत काळे, नगरपालिकेचे (मुख्याधिकारी) मंगेश देवरे, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे (पोलीस निरीक्षक) रामराव ढिकले, (पोलीस हवालदार) झुंजार बाप्पू, पोलीस गोपनीय विभागाचे संतोष कोपनर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण हे तहसीलदार प्रदीप पवार व पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दीप प्रज्वलन केले. तर, पंचायत समितीचे बिडिओ प्रशांत काळे यांनी पुष्प अर्पण केले. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये या सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहत, भगवान बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. गोरख तात्या घोडके यांच्या मार्फत सर्व उपस्थितांनी पंचशील – त्रिशरण ग्रहण केले. buddha-jayanti-celebration-in-shrigonda
यावेळी श्रीगोंदा नगरपालिकेचे (नगरसेवक) निसार भाई बेपारी, (नगरसेवक) संग्राम घोडके, हृदय(दादा) घोडके, आरपीआय (आ)चे (जिल्हा उपाध्यक्ष) अविनाश घोडके, (सामाजिक कार्यकर्ते) जीवाजी घोडके, ऑल इंडिया पँथर सेनेचे (जिल्हा उपाध्यक्ष) अमर घोडके, वलगुड गावचे (सरपंच) राम घोडके, नवजीवन पतसंस्था (चेरमन) आकाश घोडके, सुरज घोडके, आरपीआय (आ)चे (शहराध्यक्ष) विशाल घोडके, लक्ष्मण घोडके, अविनाश मल्हाराव घोडके, राम दत्तू घोडके, अरविंद पवार, विलास घोडके, शेवक घोडके, भाऊ घोडके, शिवाजी (आप्पा) घोडके, सागर मोरे, सचिन घोडके, दीपक घोडके, मच्छिंद्र ठवाळ, अभिजित सोनवणे सह समाजबांधव उपस्थित होते.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
