पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कोरोना -१९ बाबत आढावा बैठक संपन्न..

दिनांक २६ मे,श्रीगोंदा:

तालुक्यातील कोविड-१९ प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता त्यावरील उपाययोजना, केअर सेंटर्स तसेच प्रशासकीय यंत्रणेची सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तुळशीदास मंगल कार्यालय श्रीगोंदा येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी जिल्ह्याचे (कलेक्टर) डॉक्टर राजेंद्र भोसले, पोलीस (अधीक्षक) मनोज पाटील, (उपविभागीय पोलीस अधिकारी) अण्णासाहेब जाधव, (प्रांताधिकारी) धावडे मॅडम, (तहसीलदार) प्रदीप पवार, (नायब तहसीलदार) योगिता ढोले मॅडम, पंचायत समितीचे (बीडीओ) प्रशांत काळे, (पोलीस निरीक्षक) रामराव ढिकले, तालुका (आरोग्य अधिकारी) डॉक्टर नितीन खामकर, नगरपालिकेचे (मुख्याधिकारी) मंगेश देवरे, (वीज वितरण कंपनीचे) चौगुले साहेब व हर्ष साहेब, (भूमी अभिलेखचे) गोसावी साहेब, (दुय्यम निबंधक कार्यालयाचे) पालवे साहेब, (सार्वजनिक बांधकाम) विभागाचे अंपळकर साहेब याचबरोबर (राष्ट्रवादीचे) घनश्याम अण्णा शेलार, बाबासाहेब भोस, तालुक्याचे (आमदार) बबनराव पाचपुते, (माजी आमदार) राहुल जगताप, श्रीगोंदा नगरपालिकेचे (नगरसेवक) मनोहर दादा पोटे, जिल्हा परिषदेचे (माजी सदस्य) अनिल ठवाळ, बाळासाहेब नाहाटा, केशवभाऊ मगर, जिजाबापू शिंदे, हरिदास (आबा) शिर्के, स्मितल भैया वाबळे, दीपक भोसले पाटील, बाळासाहेब शेलार, प्रशांत गोरे, संजय आनंदकर (सर), (भाजपचे) संदीप नागवडे, बाळासाहेब महाडिक, (शिवसेनेचे) बाळासाहेब दुतारे, (प्रहार अपंग संघटनेचे) राजेंद्र पोकळे सह तालुक्यातील सामाजिक, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळी प्रांताधिकारी धावडे मॅडम यांनी श्रीगोंदा तालुक्यातील कोरोनाची मागील व सदयस्थिती मांडली. यात सक्रिय रुग्ण, बरे झालेले रुग्ण व मृत्य झालेल्यांची आकडेवारी बाबत खुलासा केला. यानंतर दीपक पाटील भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. काँग्रेसचे भैय्या वाबळे, हरिदास आबा शिर्के, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, अनिल ठवाळ, राजेंद्र मस्के, घनश्याम आण्णा शेलार, (आमदार) बबनराव पाचपुते (दादा) यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी संदर्भात माहिती विशद केली. कोरोनाच्या वाढत्या कालखंडामध्ये जिल्ह्यासह तालुक्यात केलेली खबरदारीची उपाययोजना त्यांनी या वेळेस बैठकीत नमूद केली.

या आढावा बैठकीला संबोधित करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव दरम्यान वाढत चाललेली आकडेवारी, मृत्युदर व बरे झालेल्या रुग्णांना बाबत आकडेवारी सादर केली. आपल्या भाषणात बोलतांना मुश्रीफ यांनी बैठकीत काही वक्त्यांनी नमूद केल्याप्रमाणे या तालुक्यात येण्यासाठी मला थोडा उशीर झाल्याचे कबूल केले. मात्र, उशीर होण्यामागे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान कालखंडात दर पंधरा दिवसाला नगर दौऱ्यात मी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु, काही कारणास्तव श्रीगोंदा व पाथर्डी या दोन तालुक्यांमध्ये जाण्याचे राहीले. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, खाजगी डॉक्टर्स, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने कोरोना संक्रमण काळात उभारलेल्या कोविड केअर सेंटर्समुळे निर्माण झालेले कोरोनाचे अनपेक्षित संकट टाळण्यास मदत झाली. त्यामुळे या सर्वांचे पालकमंत्री यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले.

कोरोनाची पहिली लाट सरल्यानंतर अचानक आलेल्या दुसऱ्या लाटेदरम्यान आपण सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे होते. तसेच येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी आपण सर्वांनी गंभीरतेने तयार राहायला हवे. असेही त्यांनी नमूद केले. लसीकरणाबाबत बोलतांना हसन मुश्रीफ म्हणाले की, लसीचा विषय राज्यापेक्षा केंद्रशासनाच्या अखत्यारीत जास्त येत असल्याने, रेमेडिसिव्हीर, ऑक्सिजन आणि कोरोनाची लस ही प्रक्रिया केंद्र सरकाराने आपल्या अखत्यारीत घेतलेली आहे. विविध राज्यातील लस पुरवठ्याबाबत केंद्राने निर्णय घ्यावा. असेही पालकमंत्री यांनी आढावा बैठकीच्या निमित्ताने नमूद केले आहे.

पाणी प्रश्नाबाबत बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, कुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा करून, लवकरात लवकर तालुक्यातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील पाणी प्रश्नाचे गांभीर्य माझ्या लक्षात आले असून, मी लवकरच याबाबत दिलासादायक निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी उपस्थितांना या आढावा बैठकीच्या अनुषंगाने सांगितले आहे. review-meeting-held-in-the-presence-of-guardian-minister-hasan-mushrif

पत्रकार परिषद

या आढावा बैठकीनंतर हसन मुश्रीफ (पालकमंत्री, अहमदनगर) यांनी पत्रकार परिषदेला संबोधले. पत्रकारांनी लसीकरणाबाबत करण्यात येणाऱ्या उपाय योजनांविषयी विचारले. त्यावर आरोग्य यंत्रणेला सूचना करून स्थानिक आरोग्य अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत नमूद यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तालुक्यासह जिल्ह्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला असून, सर्वसामान्यांचे जनजीवन गडबडले आहे. साधारण फळ व भाजी विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या पाठी काठी बसत असून, स्थानिक प्रशासन अवैद्य धंदे व वाळू माफियांच्या पाठी असल्याचे पत्रकारांनी विचारले. यावर तालुक्यात वाळूचे नीलाव झाले नसतांना, अवैध वाळू तस्करी व अवैध धंदे करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित महसूल व पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

स्त्रोत:(आयोजित बैठक)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading