इन्स्टाग्राम फेमस होण्यासाठी गुंडगिरीचा आधार; चार महाविद्यालयीन विद्यार्थी ताब्यात त्यात श्रीगोंद्यातील एकाचा समावेश…

दिनांक ३१ जानेवारी २०२५, श्रीगोंदा/पुणे:

समाज माध्यमांवर (इन्स्टाग्राम) फॉलोअर्स वाढविण्याच्या उद्देशातून कुख्यात गुंड  मारणे याच्या चित्रीकरणाचा प्रसार करून दहशत निर्माण करणाऱ्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. संबंधित प्रकरणात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विद्यार्थ्यांनी  मारणेच्या नावाने “पुण्याचा किंग”, “किंग ऑफ महाराष्ट्र” आणि “बादशहा” अशा प्रकारच्या ओळी लिहून त्याचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित केले. त्यांच्या या कृत्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण होण्याचा धोका होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत कठोर कारवाई केली.

ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे:

पोलिसांनी अक्षय शिंदे (वय १९ रा. निमगाव खलू, श्रीगोंदा), सिद्धार्थ जाधव (वय २०, रा. महंमदवाडी), साहिल शेख (वय १९), इरफान शेख (वय १९, दोघेही रा. सुंबा, धाराशिव) या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अमलदार प्रशांत शिंदे यांनी याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

विद्यार्थ्यांकडून समाज माध्यमांवर केलेल्या चित्रीकरणात धमकीवजा संवाद होते. या प्रकरणाची माहिती गुन्हे शाखेच्या रडारवर आल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने तातडीने ‘रिल्सस्टार’ना बोलावून चौकशी केली व कारवाईचा बडगा उगारला.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा प्रकारे समाज माध्यमांवर दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. “कोणत्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.

या कारवाईत अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, प्रशांत संदे, उपनिरीक्षक गौरव देव, सैदोबा भोजराव, प्रशांत शिंदे, अनिल कुसाळकर, सुरेंद्र जगदाळे, अमोल घावटे, चेतन चव्हाण, चेतन आपटे, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, गणेश खरात, किशोर बर्गे, रूपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने सहभाग घेतला.

स्रोत: (ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading