#श्रीगोंदा.. लोणी व्यंकनाथ येथे जमिनीच्या वादातून खून प्रकरण: फिर्याद दाखल..

दिनांक: ३१ जानेवारी २०२५ | श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यकनाथ येथे जमिनीच्या वादातून खुनाची गंभीर घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी उमाजी धोंडीबा उजागरे (रा. लोणी व्यकनाथ) हे आपल्या घराच्या पडवीत झोपलेले असताना पहाटे चारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

फिर्यादीच्या मते, आरोपी बाटक्या सोपान काळे आणि शरद बाटक्या काळे (दोन्ही रा. लोणी व्यकनाथ) यांनी जमीनीच्या वादातून तसेच २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रिपुस भोसले आणि सपना भोसले यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या वैद्यकीय मदतीचा राग मनात ठेवून हा गंभीर गुन्हा केला आहे.

आरोपींनी आणखी तीन अनोळखी साथीदारांच्या मदतीने संगनमत करून उमाजी उजागरे यांच्या डोक्यावर लाकडी दांडके आणि लोखंडी गजाने हल्ला करून त्यांचा निर्घृण खून केला असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

या घटनेनंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध जितेंद्र उजागरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिस तपास सुरू:
पोलिसांनी या गंभीर घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपास सुरू केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली.

पीडितांना रीपाईचे पदाधिकारी राजा जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले..

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading