श्रीगोंदा पोलिस स्टेशन: दारुबंदी कायद्याअंतर्गत संजय शेंडगेवर गुन्हा दाखल..

दिनांक २८ जून २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलिस स्टेशन मध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिनांक २८ जून २०२४ रोजी पोलीस कॉन्स्टेबल शरद देविदास गावडे यांनी ही फिर्याद दाखल केली आहे.

प्रकरणातील आरोपी संजय रामराव शेंडगे (वय ४८ वर्षे) हॉटेल व्यवसाय करत असताना, श्रीगोंदा ते काष्टी जाणाऱ्या हायवे रोडवरील शेंडगेवाडी शिवारातील हॉटेल वैष्णवी येथे पहाटे १:०० वाजता, विदेशी दारू विनापरवाना बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगतांना मिळून आला. जप्त मालाची एकूण किंमत ११,०३५/- रुपये असल्याचे समजते.

पोलीस हवालदार एस.एस.फलके यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास कार्यवाहीसाठी दाखल केले आहे. दाखल अंमलदार पो.हे.काँ. राहुल शिंदे यांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पपोलीस अधिकारी श्री ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू असुन, पोलिस अधिक तपास करत आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

स्रोत:(पोलीस कारवाई)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading