दिनांक २७ जुन २०२४, श्रीगोंदा/अहमदनगर:
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक काल शांततेत पार पडली, अहमदनगर जिल्ह्यात एकूण ९३.८८% मतदान झाले. १११८९ पुरुष मतदार आणि ५१३८ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीगोंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्रामध्ये ९२.५४% मतदान झाले.
मतदान केंद्रांवर प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तहसीलदार वाघमारे मॅडम आणि प्रांत अधिकारी सावंत मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या. निवडणूक आयोगाचे निरीक्षकही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लक्ष ठेवून होते.
रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सचिन झगडे यांनी मतदानाच्या दिवशी प्रतिनिधीशी संवाद साधला. त्यांनी निवडणुकीत झालेल्या भ्रष्टाचाराची निंदा केली.
झगडे म्हणाले, “शिक्षकांना साडी, पॅन्ट-शर्ट कापड, नथ, पैशाची पाकिटे वाटप करण्यात आले आहे. हे समाज माध्यमातून समजले. समाजातील आणि देशातील शिक्षकांच्या चारित्र्यावर काळा डाग आहे. येणाऱ्या काळात स्वच्छ चारित्र्याच्या कार्यकर्त्यांची फौज उभी करून समाजातील शिक्षकांविषयीचा गैरसमज दूर करण्याचे काम करू.”
अहमदनगर जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)



