दिनांक २७ जून २०२४, कोळगाव, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हजरत लंगरशहा बाबा दर्गाहचा संदल व उरुस शरीफ मोठया उत्साहात साजरा झाला. या उत्सवात राज्यासह परराज्यातील भाविकांनी गर्दी करत दर्शन घेतले.
हजरत लंगरशहा बाबा दर्गाह गुंडेगाव रस्त्यालगत अत्यंत निसर्गरम्य वातावरणात आणि कलात्मकतेने बनवले असून, दरवर्षी प्रमाणे २४ आणि २५ जून रोजी मोठ्या उत्साहात हजरत लंगरशहवली बाबा यांचा संदल व उरुस संपन्न झाला. यावेळी संदल, महफिल ए चिराग, महाफील ए समा, जीआरत और फातेहा आणि लंगर या सारख्या विविध कार्यक्रमांचे सलग तीन दिवस आयोजन करण्यात आले होते.
२४ जून रोजी लंगरशहा बाबा संदलची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यासह राज्य परराज्यातील मुस्लिम बांधवांनी उरुसाला हजेरी लावत दर्शन घेतले. २५ जून रोजी संदलची मौलवींच्या उपस्थितीत आणि मा. मंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते लंगरशहा बाबा येथे चादर चढविण्यात आली. सायंकाळी शाहिद अजमेरी यांच्या कब्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या संदलच्या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे तालुकाध्यक्ष अकील इनामदार, कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच संतोष मेहत्रे, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, चिमणराव बाराहाते, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रवीण खेतमाळीस, संतोष कोतकर, शब्बीर इनामदार, रशीद इनामदार, फारुख इनामदार, समीर इनामदार, बाबू इनामदार, शकील इनामदार तसेच परिसरातील मुस्लिम बंधू भगिनी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
स्रोत:(पत्रकार जावेद इनामदार)



