श्रीगोंदा: पोलिसांनी हॉटेल मालकासोबत मारहाण केली..

दिनांक २८ जून २०२४ श्रीगोंदा:

श्रीगोंदा काष्टी रोडवरील वैष्णवी हॉटेलमध्ये उशिरापर्यंत हॉटेल उघडे ठेवलेल्या कारणावरून पोलिसांनी हॉटेल मालक शेंडगे आणि त्यांचा मुलगा यांना मारहाण केल्याची घटना रात्री १२:०० वाजता घडली. या प्रकरणी शेंडगे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११:५० वाजता श्रीगोंदा काष्टी रोडवरील वैष्णवी हॉटेल बंद करण्याच्या सूचना पेट्रोलिंगला असलेले पोलिस फलके व गावडे यांनी संजय शेंडगे यांना दिल्या. रस्त्यावर गाड्यांची गर्दी आणि वेळेचे बंधन यामुळे केलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत पोलीस आणि शेंडगे यांच्यात वाद झाला. शेंडगे यांनी पोलिस पथकावर धावून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शेंडगे यांच्या मुलाच्या कानशिलात मारले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचे दृश्य आल्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, उशिरापर्यंत उघडे असलेल्या हॉटेल मालकांना दुकाने बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, ज्यात उपसरपंच हॉटेल, सम्राट चायनीज व वैष्णवी हॉटेल यांचा समावेश होता.

पोलीस वर्दीचा धाक असणे गरजेचे आहे. पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून त्यांच्याशी हुज्जत घालणे आणि धावून जाणे हे चुकीचे असल्याचे स्थानिक नागरिकांनी नमूद केले आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading