दिनांक २८ जुन २०२४,श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३(१)(आर)(एस), ३(२)(व्ही ए) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी गौरी राहुल जाधव (वय २६ वर्षे, धंदा – घरकाम व शेती रा. मोरेवाडी, आजनुज) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २७ जुन २०२४ रोजी सायंकाळी ५:४५ ते ६:३० वाजेच्या दरम्यान आजनुज ते पेडगांव जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी कोमल सुधीर कदम, रेश्मा गणेश कदम, शोभा हनमंत कारले, विजया नामदेव रंदवे, सुधीर मोहन कदम, आणि संतोष रामभाऊ कदम (सर्व रा.आजनुज) यांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या पतींना लाकडी काठ्या व लोखंडी गजाने मारहाण केली.
या घटनेची माहिती पोलिसांना रात्री १०:०० वाजता मिळाली. प्रभारी अधिकारी दिनांक २७/०६/२०२४ रोजी रात्री १०:०० वाजता घटनास्थळी पोहोचले. सध्या या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
स्रोत:(फिर्याद)




