छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमणाविरोधात रक्ताचा अभिषेक..

दिनांक १८ जुन २०२४, श्रीगोंदा प्रतिनिधी:(जावेद इनामदार)

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड व समस्त शिवशंभू प्रेमींनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर रक्ताचा अभिषेक घालण्यात आला.

या वेळी महसुल प्रशासनाचा निषेध व्यक्त करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीसमोर रक्ताचा अभिषेक करण्यात आला. दुसरीकडे, संभाजी ब्रिगेडने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

तहसीलदार मॅडम यांनी प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्यास विलंब झाल्याचे मान्य केले आणि यापुढे या विषयात जलद काम करत लवकरात लवकर अतिक्रमण काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या आंदोलनात सहभागी प्रमुख व्यक्ती आणि पदाधिकारी:
– अरविंद कापसे – जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
– इंजि. शामभाऊ जरे – तालुकाध्यक्ष
– नाना शिंदे, दिलीप लबडे – उपाध्यक्ष
– गोरख घोडके – कार्याध्यक्ष
– विनोद मेहत्रे – शहराध्यक्ष
– बालु दादा मखरे, मंगेश मोटे, वैभव वनशीव, गणेश पारे, नाना शिंदे इत्यादी..

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती:
– (काँग्रेस नेते) घनशाम आण्णा शेलार
– (माजी आमदार) राहुल दादा जगताप
– (शिवसेना उपनेते) साजन भैय्या पाचपुते
– राजेंद्र आबा मस्के
– (शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा) मिराताई शिंदे
– (आर.पी.आय.नेते) राजाभाऊ जगताप
– बाळासाहेब दुतारे
– (माजी नगराध्यक्ष) मनोहर दादा पोटे, एम. डी. शिंदे
– अन्य मान्यवर आणि शंभू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनाला शेकडो तरुणांनी रक्तदान करून पाठिंबा दिला, ज्यामुळे या आंदोलनाची प्रभावीता वाढली.

स्रोत:(आंदोलन)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading