दिनांक १८ जून २०२४ श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील भोळे वस्ती आणि रायकर वस्तीच्या रहिवाशांनी नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. रहिवाशांनी वारंवार रस्त्याच्या दुरवस्था विषयी तक्रारी करूनही नगरपालिकेकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत मॅडम यांना निवेदन सादर केले आहे.
रहिवाशांनी दोन दिवसांत दोनवेळा भेटून स्थानिकांच्या विनंतीनंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने, त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. निवेदनात सागर कोथंबिरे, तुषार रायकर, दादा वडवकर, किरण वडवकर, ओमकार रायकर, किरण हिरडे, अमोल भोळे, हनुमंत रायकर, नवनाथ रायकर, मिठू रायकर, संतोष रायकर, राहुल वडवकर, सचिन हिरडे, दिपक भोळे यांनी त्यांच्या मागण्यांचा उल्लेख केला आहे.
आंदोलनातील मागण्या:
- भोळे वस्ती रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी.
- बस स्थानकामधील आतील बाजूचा कचरा याचे कायमस्वरूपी नियोजन करावे व परिसरात स्वच्छता राखावी.
- पिंपळे वस्ती वरून वडवकर वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याला साईड पट्टी करणे.
रहिवाशांनी नमूद केले आहे की, येत्या दोन दिवसांत कमीत कमी मुरुम भरून खड्डे व्यवस्थित करावेत आणि रस्ता डांबरीकरणासाठी लवकरात लवकर मंजुरी मिळवावी. अन्यथा, दिनांक २४ जून २०२४ सोमवार रोजी श्रीगोंदा नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. असे म्हंटले आहे.
स्रोत: (निवेदन)


