नीट परीक्षेत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश..

दिनांक १९ जुन २०२४, श्रीगोंदा:

रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा २०२३/२४ मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

नीट परीक्षेत सोनवणे श्रेयस मारुती यांनी ६४० गुण, खाडे शुभदा वामन यांनी ६१७ गुण, श्रद्धा सदाशिव कापसे यांनी ५७७ गुण, काळाने निकिता साहेबराव यांनी ५५२ गुण, दिवेकर श्वेता दत्तात्रेय यांनी ५३४ गुण, देशमुख सार्थक राहुल यांनी ५१७ गुण, भोगील रेश्मा सेवक यांनी ५०० गुण आणि दरेकर तन्मय दिलीप यांनी ४८० गुण प्राप्त केले आहेत.

महाविद्यालयामध्ये नियमितपणे नीट, जेईई व सीईटी या स्पर्धा परीक्षांचे स्वतंत्र मार्गदर्शन तसेच क्रॅश कोर्सचे वर्ग चालू असतात.

यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. बाबासाहेब भोस, प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, विज्ञान विभाग प्रमुख बाळासाहेब शेटे व सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले आहे.

स्रोत: प्रसिद्धी पत्र

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading