आढळगाव सेवा संस्थेच्या चेअरमन पदी गणेश शिंदे तर, व्हा.चेअरमन पदी अशोक ढवळे यांची निवड..

दिनांक १७ जून २०२४, श्रीगोंदा: (प्रतिनिधी: जावेद इनामदार)..

आढळगाव सेवा संस्थेच्या मावळते चेअरमन दादासाहेब गव्हाणे आणि व्हा. चेअरमन ज्ञानदेव गाढवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदांवर गणेश शिंदे यांची चेअरमन पदी तर अशोक ढवळे यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

सोमवार, १७ जून रोजी सकाळी १०:०० वाजता संचालक मंडळाच्या सभेमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली. चेअरमन पदासाठी गणेश शिंदे यांच्या नावाची सूचना संचालक मेजर संतोष धोत्रे यांनी केली. तर, त्यास राजाराम गदादे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी अशोक ढवळे यांच्या नावाची सूचना संचालक गोरख ठवाळ यांनी मांडली, ज्यास दत्तात्रेय चव्हाण यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन बी मुंडे यांनी काम पाहिले, तर संस्थेचे सचिव मुकिंदा शिंदे यांनी त्यांना मदत केली.

या प्रसंगी सरपंच शिवप्रसाद उबाळे, खरेदी विक्रीचे व्हाईस चेअरमन शरद जमदाडे, पत्रकार उत्तम राऊत, चेअरमन बाळासाहेब शिंदे, देवराव शिंदे, अंबादास चव्हाण, जालिंदर बोडखे, मनोहर शिंदे, राहुल राऊत, संदीप काळणे, संदीप सूर्यवंशी तसेच सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन गणेश शिंदे आणि व्हा. चेअरमन अशोक ढवळे यांनी सर्व संचालक आणि सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेच्या हिताचे आणि फायद्याचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. खासदार निलेश लंके आणि माजी आमदार राहुल जगताप पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading