पेडगाव सोसायटीत राज्याभिषेक दिन साजरा.

दिनांक ६ जून,श्रीगोंदा :

श्रीगोंदा तालुक्यातील किल्ले धर्मवीरगडासाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक पेडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या “राज्याभिषेक दिना” निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आज दिनांक ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत शेतकऱ्यांची कामधेनु असलेल्या पेडगाव सोसायटीच्या कार्यालयात ‘शिवप्रतिमेचे” पूजन करत, विनम्र मानाचा मुजरा करून अभिवादन केले.

यावेळी (चेअरमन) रोहिदास पवार, (सचिव) हरिभाऊ झिटे, लक्ष्मीकांत शिर्के, विष्णू गावडे, भारत खेडकर, सुनील खेडकर, दादासाहेब मांडगे, सागर गोधडे, विनोद गोधडे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading