दिनांक ६ जून,श्रीगोंदा:
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे तालुक्यातील सलुन दुकान दिनांक २३ मार्च पासून बंद ठेवण्यास सांगितले होते. या काळामध्ये सलून व्यवसायिकांनी आपले आदेश पाळून सलून व्यवसाय पूर्णतः बंद ठेवले. परंतु, आत्ता सलून व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक वेळास्थानिक प्रशासनास निवेदन देऊन हि व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली नाही.
तामिळनाडू, दिल्ली या सारख्या राज्यांना सलून व्यवसायास नियमासह परवानगी दिली आहे. आपण हि अशा प्रकारे नियमावली घालून, सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी.किंवा दरमहा १० हजार रु. प्रत्येकी सलून व्यावसायिकांस (दुकान मालक व कारागीर) यांना तातडीने द्यावे. अन्यथा, दिनांक ८ जुन २०२० पासून लोकशाहीच्या मानवी मूल्यांच्या अधिकारानुसार आंदोलनाची भूमिका घेऊ. या आंदोलनामुळे काही परिणाम उध्दभवल्यास सर्वतोपरी शासनच जबाबदार राहिल. असे निवेदन श्रीगोंदा तालुका बारा बलुतेदार महासंघ व श्रीगोंदा तालुका नाभिक महामंडळ यांच्या वतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयात श्रीगोंदा चे तहसीलदार महेंद्र माळी व नायब तहसीलदार सौ. चारुशिला पवार यांना देण्यात आले.
यावेळी (नाभिक युवक जिल्हाध्यक्ष) पै. अजय रंधवे,(अहमदनगर जिल्हा बारा बलुतेदार महासंघाचे नेते) कांतीलाल कोकाटे, (श्रीगोंदा तालुकाध्यक्ष) विजय (भाऊ) क्षिरसागर, (शिवराय केसरी) पै. रोहन (बंटी) रंधवे,(बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा सचिव) इंद्रजित दादा कुटे, (युवक जिल्हा संपर्क प्रमुख) शरद शिंदे, (बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख) गणेश शिंदे, मल्हारी रंधवे, (श्रीगोंदा शहराध्यक्ष) राजेंद्र कुटे, अशोक सांगळे, रोहित क्षिरसागर, सनी दळवी, अनिल राऊत, सागर राऊत, महेश शिंदे, माऊली कोकाटे, अक्षय दळवी यावेळी उपस्थित होते.
