नगरसेवकांनो ! आता खरी गरज आहे जनतेला तुमची..

दिनांक २७ मार्च,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेश डांगे हे सामाजिक माध्यमातून कोरोना प्रादुर्भावाच्या विरोधात मोठी जनजागृती करतांना दिसत आहेत.त्यांनी गेल्या काही दिवसांपासून नमूद प्रकरणी मोठे जनआंदोलन उभारले असून, सामाजिक भान राखत या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला-खांदा देत याबाबतची माहिती समाज घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिकरीचा प्रयत्न करत आहेत.

त्यानुसार त्यांनी स्थानिक नगरपालिका नगरसेवक यांना विनंती केली आहे की,शहरात बाहेरुन आलेल्यांची माहीती नागरीकांनी लपवु नये.तसेच या कामी स्थानीक नगरसेवकांनी मदत करावी.त्याबरोबर या सर्व व्यक्तींची माहीती शासनाला आपण होवून कळवावी.शासन फक्त आपले स्क्रिनिंग करुन १४ दिवस घरात बसण्याचा सल्ला देते आहे.

कदाचीत एखादा पॉझीटीव्ह रुग्ण असल्यास? त्याच्यामुळे कुंटुबीयासह सर्व परिसराला धोका नीर्माण होऊ शकतो.सामाजीक भान राखुन नागरिकांनीच कूपया कळवावे.तसेच स्थानीक नगरसेवकांनी ही या कामी पुढाकार घ्यावा प्रसंगी कठोर पावले उचलावी.मतदार नाराज होईल याची काळजी करु नये.मतदारच वाचला नाही ? तर, आपण काय करनार ? नगरसेवकांनी नीदान ऐवढ तरी काम करावे.नगरसेवकांनो आता खरी गरज आहे जनतेला तुमची.अशी कळकळीची विनंती राजेश डांगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading