दिनांक २६ मार्च,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरालगत पेडगाव रोड नजिक भटके – विमुक्त समाजाची वस्ती आहे. याठिकाणी राहणाऱ्या २० कुटुंबातील लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे . या सर्व लोकांचा उदरनिर्वाह भटकंतीवर अवलंबून असून,सध्या देशांमध्ये धारा १४४ लागू झाल्यामुळे संचारबंदी करण्यात आलेली आहे.
यामुळे भटक्या-विमुक्तांची भटकंती थांबलेली आहे.तरी,सध्या जगावे की मरावे?असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला असून,सध्या त्यांच्याकडे पुरेसे धान्य व पुरेसे पैसे नसल्यामुळे,त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.तशेच, पुढचे एकवीस दिवस त्या लोकांनी कसे जगावे ? हा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे.

या आपत्ती मध्ये भटक्या-विमुक्तांना मदतीसाठी बहुजन क्रांती मोर्चाने आवाहन केले. या आवाहनाला श्रीगोंदा वासियांनी तात्काळ प्रतिसाद दिला. यातून प्रत्येक कुटुंबाला तांदूळ,पिठ, डाळ, तेल, मीठ, मिरची, मसाला असे किराणा साहित्य खरेदी करून त्याचे पॅकेट बनवून वाटप “बहुजन क्रांती मोर्चा” चे (जिल्हा संयोजक)विजय गायकवाड व (राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे) इंजि.फिरोज पठाण तसेच संजय सावंत, श्रीरंग साळवे आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ते वाटप करण्यात आले.
तसेच पुढेही “बहुजन क्रांती मोर्चा” च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, अजूनही श्रीगोंद्यामध्ये गरजू कुटुंब आहेत, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे.आपणाकडे जे उपलब्ध असेल ते किराणा, भाजीपाला, किंवा आर्थिक मदत आपण करू इच्छित असाल ? तर ,बहुजन क्रांती मोर्चाशी संपर्क करावा,गरजूंपर्यंत ही मदत पोहोचवली जाईल.असेही या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
